Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज!!!

शाहू भोसले (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२), छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. १८८४-१९२२ दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. शाहू महाराज शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव (आप्पासाहेब) तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

.... *१ मे* ..................                           🚩         ▁▂▄▅▆▇█▇▆▅▄▂▁                   🌸🌼🌺 हि मायभूमी, हि जन्मभूमी, हि कर्मभूमी  ही आमची.. योग्यांची अन संतांची, भक्तांची, माळक-यांची, तलवारीच्या पात्याची.. देशाचे रक्षण करण्यारया झुंजारांची हि भूमी सप्त सुरांची, रंगांची, अष्टकलांची.  काव्याची, शास्त्र - विनोदाची,  हि भूमी साहित्याची ! शिवरायांची, संभाजींची, बाजीरावांची. माऊली, जगद्गुरु व दासांची.. गड गर्जती पराक्रमाचे गाती पोवाडे अभिमानाची… ही भुमी योद्धयांची, वीरांची, त्यागाची अन् स्वातंत्राचे स्पुर्तीची…  ही भुमी महाराष्र्टाची ! देव, देश अन् धर्मापायी प्राण वेचणारयांची ! 🌻 🌻  १ मे १९६० हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा दिवस.महाराष्ट्रचा भारत देशाच्या विकासात प्रत्येक क्षेत्रात आजवर सिंहाचा वाटा होता.. आहे आणि राहणारच आहे असे सुसंस्कृत राज्य... याच महाराष्ट्राने देशापूढे शौर्य.. स्वातंत्र्य.. समता.. एकात्मतेचा आदर्श ठेवलाय. महाराष्ट्र म्हणजे रत्नांची खाण....  जगातला हा सर्वात शांतताप्रिय सुरक्षित, सहिष्णु प्रदेश. देशात शिक्षण.. आरोग्य.. उद्योग.. कला.. क्रीडा अश्या सर्वच क्ष

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. India-MAHARASHTRA.svg १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात १ मे रोजी मेपोल हा काठी महोत्सवसुद्धा साजरा होत असतो. २१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फा