Wednesday, 11 March 2026

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान* ============================दिनांक:- १०मार्च,२०२६
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन आनंदी वं उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत चोरांबेचे सरपंच श्री.विजय सपकाळ हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी होते. याप्रसंगी विचारमंचावर डॉ. सुषमा सपकाळ,तुषार सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीस रोपट्यास पाणी घालून उदघाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे श्री.विजय सपकाळ यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांना संबोधित करताना स्त्रियांविषयी समाजात  केला जाणारा भेदभाव,अन्याय व अत्याचार या बाबींना कठोर विरोध करणे आवश्यक असल्याचे सांगितले.महिलांविरुद्ध केला जाणारा भेदभाव, अन्याय व अत्याचार याविषयी आवाज उठविणे.आरोग्य शिक्षण आणि रोजगार यासाठी महिलांचे प्रबोधन करणे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. “ असे सांगून त्यांनी महाविद्यालयाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी म्हणाले की,” स्त्रीशक्तीचा सन्मान, कर्तृत्व आणि समानतेचा उत्सव आहे. हा दिवस महिलांच्या संघर्षाची जाणीव करून देत, त्यांना सक्षम  करण्यासाठी प्रेरित करतो. समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोलाचे असून, त्यांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी आणि आदर देणे ही काळाची गरज आहे तसेच महिलांचे सक्षमीकरण करणे ही समाजाची सामुहिक जबाबदारी आहे.महिला सक्षमीकरणाची सुरवात आपल्या घरापासूनच होणे आवश्यक आहे.म्हणूनच आपल्या घरातील मुली व महिलांना समाजात योग्य सन्मान देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत”  असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय धोंडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सन्मान पत्राचे वाचन प्रा.सौ.गायत्री जाधव यांनी केले.. 
प्रारंभी या कार्यक्रमास निमंत्रित केलेल्या चोरांबे येथील उच्च शिक्षित महिला ज्यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाची नॅनो सायन्स मध्ये पीएच.डी पदवी प्राप्त झाली आहे त्या डॉ.सौ.सुषमा सपकाळ यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर प्राणिशास्त्र विभागाची कु.नेहा जुनघरे हिने सेट ( राज्य पात्रता चाचणी परीक्षा ) उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच महाविद्यालयातील एन.एस. एस, क्रीडा, सांस्कृतिक विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विध्यार्थिनी आणि महिला प्राध्यापिका यांचा उचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आनंद साठे  यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ.बाळासाहेब उघडे,श्री.जगदीश ओंबळे तसेच एन.एस.एस.चे स्वयंसेवक विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी व विध्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.विनोद पवार यांनी आभार मानले.

Tuesday, 20 January 2026

लोक महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते - डॉ. राजेश मिरगे **

*लोक महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते - डॉ. राजेश मिरगे **
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा आणि श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने  डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत आयोजित केलेला विशेष व्याख्यान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात गुंफण्यात आले. यावेळी अमरावती येथील संत साहित्याचे अभ्यासक तथा इतिहास विश्लेषक डॉ. राजेश मिरगे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रकाश टाकला डॉ.पंजाबराव देशमुख हे भारतीय कृषी क्रांतीचे प्रणेते  आहेत.  देशाच्या शैक्षणिक विकासातील  एक अग्रगण्य व्यक्ती  आहेत. देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी,आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. याबरोबरच भारतीय संविधानामध्ये  त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे .शाहू ,फुले  आणि आंबेडकर या युगपुरुषांच्या कार्याप्रमाणेच  पंजाबराव देशमुख यांनी  केलेले कार्य आजच्या पिढीला माहित असणे गरजेचे आहे.बहुजन समाजाचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा  हे त्यांचे स्वप्न होते. शेती हा आपल्या देशाचा आत्मा आहे. त्यामुळे शेती आणि शेतकर्‍यांचा विकास हे त्यांचे स्वप्न होते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रारंभी श्री. शिवाजी शिक्षण संस्था संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथील प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी प्रास्ताविकात ही व्याख्यान माला आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी यांनी  डॉ. पंजाबराव देशमुख  यांच्या  सारख्या महापुरुषांना समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीने घेऊन स्वतःच्या तसेच समाजाच्या व देशातील ग्रामीण भागातील व प्रामुख्याने अविकसित प्रदेशातील नागरिकांच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करावे असे प्रतिपादन केले. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. प्रमोद घाटगे हे या प्रसंगी उपस्थित होते.प्रा.शंकर गेजगे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रा.सौ. गायत्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय धोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 8 December 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी.•••••••••••••••••••••••••••••••“

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “
प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी.
•••••••••••••••••••••••••••••••

“ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शिक्षण, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यांवर आधारित होते, ज्यात 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ' ही त्यांची मुख्य शिकवण होती.त्यांनी जातिभेद निर्मूलन, महिला सक्षमीकरण,कामगार हक्क आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “ असे मत प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी यांनी व्यक्त केले.जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते.
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर पुढे म्हणाले,"डॉ.आंबेडकर यांचे विचार गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित होते, ज्यात शिक्षणाला वाघिणीचे दूध मानले गेले आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यावर भर दिला गेला. त्यांच्यामते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,असे ते म्हणाले. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत असावा यावर त्यांचा भर होता.जाती-आधारित भेदभावामुळे दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला आणि सामाजिक न्यायाची मागणी केली.त्यांनी लोकांना संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले, याशिवाय त्यांनी देशातील सर्वच स्त्रियांच्या हक्कांसाठी  अथक प्रयत्न केले, त्यांचे शिक्षण आणि सामाजिक स्थान उंचावण्यासाठी त्यांनी कार्य केले.ते गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांना आपले गुरु मानत होते.या महामानवांचा विचार प्रमाण मानला. ते स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी न्याय, समता आणि बंधुतेवर आधारित लोकशाहीची स्थापना केली.असे सांगून प्राचार्य डॉ. अशोक गिरी सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या बुद्धिमत्तेचा विकास केला आणि देशातील दिन- दलित,आदिवासी, स्त्रिया व सर्व भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, न्याय हे मूलभूत अधिकार व हक्क बहाल केले. “ कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय धोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी राज्यशास्त्र विभाग प्रमुख सौ.गायत्री जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
================

Saturday, 8 November 2025

*भारत देशाची एकता व आंखडता राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे!**:तहसीलदार मा.हणुमंत कोळेकर*==================*

*भारत देशाची एकता व आंखडता राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे!*

*:तहसीलदार मा.हणुमंत कोळेकर*


==================
*मेढा -*
*७ नोव्हेंबर २०२५*

" बंकिमचंद्र चटर्जी यांनी आपल्याआनंदमठ या कादंबरीत
वंदे मातरम हे गीत लिहिले त्यास आज १५० वर्षे पूर्ण झाली असून या गाण्यातील देशप्रेम व देशभक्ती आपण विसरून जाऊ नये हीच या कार्यक्रमामागील मुख्य प्रेरणा असून,भारत देशाची एकता व आंखडता राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे!" असे मत 
तहसीलदार मा. हणुमंत कोळेकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्य कौशल्य,
रोजगार,उद्योजगता आणि नावीन्यता विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व वेण्णा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम सार्ध महोत्सव व वंदे मातरम गीत गायन कार्यक्रम येथील कलश मंगल कार्यालयात आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.त्याप्रसंगी मा. कोळेकर साहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी मा.निलेश पाटील,प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी,मेढा आगार प्रमुख निता बाबर, वनरक्षक रोशनी मॅडम, प्राचार्य बी. बी.पाटील,
आदिनाथ ओंबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
७ नोव्हेंबर रोजी बकिंमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या " वंदे मातरम " या राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वंदे मातरम या गाण्याचे सामूहिक गायन व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सुरुवातीस प्राचार्य मेजर डॉ अशोक व्ही.गिरी, तहसीलदार मा.हणुमंत कोळेकर व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून या महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने, प्राचार्या सौ. अश्विनी शिंदे व प्रा.शेख सर यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
त्यानंतर ९. ५० वाजता " वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.यासाठी वेण्णा विद्या मंदिर व ज्यु. कॉलेज,आय. टी. आय,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय व प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी - विध्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थित होते.
त्यानंतर प्रमुख वक्ते प्रा.मयूर धारक यांचे " वंदे मातरम " या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी बकिंमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताचा इतिहास व अर्थ सांगितला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेढा येथील प्रभारी प्राचार्य सौ.अश्विनी शिंदे यांनी प्रास्ताविक केले.प्रा.आनंद साठे व बळवंत पाडळे गुरुजी यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात वेण्णा विद्या मंदिरच्या विध्यार्थी कलाकारांनी " वंदे मातरम " या विषयावर सुंदर लघुनाटिका सादर करून रासिकांची मने जिंकली.या कार्यक्रमास मेढा शहरातील विविध शासकीय - निमशासकीय कार्यालयाचे  सर्व अधिकारी व कर्मचारी,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,वेण्णा विद्या मंदिर व ज्यु.कॉलेजचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 
तसेच सामाजिक, कला,साहित्य क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी खूपच परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या शेवटी आय. टी. आय. चे स्टोअर किपर श्री. इंदलकर यांनी आभार मानले.....

Wednesday, 29 October 2025

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा !!

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

मेढा/ दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी सर होते त्यांनी आपल्या मनोगतात डॉ.एस.आर. रंगनाथन याचा जन्मदिन हा ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो तसेच सर्वांनी जास्तीत जास्त ग्रंथालयाचा वापर केला पाहिजे, सर्व वाचकांनी ग्रंथालय वेबसाईट चा वापर करून त्या ठिकाणी असणारे इ-स्त्रोत जास्तीत जास्त वाचले पाहिजेत. स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त ऑडीओ बुक्स सुद्धा एकली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी सर्वगुण संपन्न होण्यासाठी ग्रंथालयाचा वापर करून आपली ज्ञान वृद्धी केली पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रमुख उपस्थिती डॉ. प्रमोद घाटगे सर यांनी महाविद्यालयाचा विकासात ग्रंथालयाचा अनमोल वाटा आहे असे उद्बोधन केले सर्व ग्रंथालय कर्मचार्यांना शुबेछ्या दिल्या. 
या प्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.सुधीर नगरकर यांनी प्रास्ताविक केले त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला तसेच महाविद्यालयाने आयोजित केलेल्या वकृत्त्व स्पर्धेसाठी शुभेछ्या दिल्या. सूत्रसंचालन संख्याशास्त्र विभाग प्रमुख शुभांगी पाटील यांनी केले तसेच प्रा.बापू पाटील यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. प्रमोद चव्हाण तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय धोंडे व डॉ. संजय भोसले आणि प्रा. संतोष कदम उपस्थित होते. या कार्यक्रमाचा लाभ ५० विध्यार्थ्यानी घेतला.

Sunday, 19 October 2025

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न **

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न ** आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे संस्थेचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील जिमखाना विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे तसेच महाविद्यालयीन युवतींमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी सांगीतले. क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय सातारा येथील ब्लड बँक आणि ग्रामीण रुग्णालय मेढा येथील रेड रिबन क्लब यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदानाचे आपले पवित्र कर्तव्य बजावले. तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनींनी आपली हिमोग्लोबिन तपासणी करून घेतली.या समाजसेवी उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशाली शिंदे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी आणि महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. प्रमोद घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभागाचे डॉ. प्रमोद चव्हाण, एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय धोंडे, डॉ.विनोद पवार तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व सदस्य, स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान* ==============...