मेढा दि . 31 ऑगष्ट रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयांमध्ये सालाबादा प्रमाणे गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . सकाळी आरती झाल्यानंतर सर्व मुलीसाठी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तदनंतर लिंबू चमचा, बास्केटबॉल, संगीत खुर्ची व गरबा इत्यादी विविध कार्यक्रमा बरोबर विविध कलागुण दर्शन व पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मंगळागौरी आधारित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य मुलींनी आपला उत्स्फुर्त सहभाग नोंदवला होता .
याचबरोबर मुलांसाठी ही बास्केटबॉल हाफपीच क्रिकेट व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी प्रत्येक विभागातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले असून पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे ही दिली जाणार आहेत.
या स्पर्धा २८ ऑगष्ट ते ३०,ऑगष्ट 2025 पर्यत आयोजित करण्यात आल्या होत्या .
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनीही आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व समन्वयक श्री.संतोष कदम सर सहाय्यक समन्वयक सौ.शिर्के एस एम मॅडम तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय धोंडे सर त्यांचे सर्व सहकारी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी श्री रवींद्र ओंबळे, धनश्री शेलार, आर्पिता चव्हाण ,आकांक्षा चव्हाण, तृप्ती पवार व मधुरा शेलार तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेमध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब व सचिव सन्माननीय वैशाली शिंदे यांनी केले. गणेशोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम इ. यशस्वी पद्धतीने पूर्ण होण्यासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा डॉ.प्रमोद घाटगे व महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्हि गिरी यांनी "विद्यार्थ्यांनी सर्व गुण संपन्न राहिले पाहिजे तसेच आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या उज्ज्वल विविध सामाजिक व सांस्कृतिक रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती यांचा परिचय व्हावा व त्यांचा विकास व्हावा असे मोलाचे मार्गदर्शन केले. अशाप्रकारे गणेशोत्सव महोत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment