
केळघर : सोशल मीडियाच्या वाढत्या आक्रमणामुळे आजची युवापिढी इंटरनेटच्या जाळ्यात ओढली जात आहे. मात्र आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार, कष्ट करण्याची तयारी व कठोर परिश्रम यामुळे सामान्य कुटुंबातील अगदी छोट्याशा खेड्यातील युवक देखील आज उच्च पदस्थ अधिकारी होत आहेत. त्यामुळे युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे याबरोबरच आपले संस्कार कायम आपल्या सोबत ठेवावेत,निश्चित यशाला गवसणी घालता येईल असा विश्वास तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी व्यक्त केला. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वरोशी येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयडीबीआयचे सेवानिवृत्त उपमहाप्रबंधक विजयराव मोकाशी,आमदार शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, वरोशी चे सरपंच विलास शिर्के, उपसरपंच संदीप कासुर्डे, ग्रामसेवक एन. के. जाधव, माजी सरपंच सुरेश कासुर्डे, केशव कासुर्डे, आतिष कदम आदींची उपस्थिती होती. तहसीलदार पोळ म्हणाले, जावळी तालुक्यासारख्या दुर्गम व डोंगराळ विभागात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाने गुणवत्तेची एक परंपर...