Wednesday, 24 June 2026

नियोजनपूर्वक व सातत्यपूर्ण अभ्यास तसेच सुयोग्य मार्गदर्शन हेच नेट/ सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक मूलमंत्र: नॅशनल ऑनलाइन वर्कशॉप चे उद्घाटक प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्हि. गिरी!!*

*नियोजनपूर्वक व सातत्यपूर्ण अभ्यास तसेच सुयोग्य मार्गदर्शन हेच नेट/ सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक मूलमंत्र: नॅशनल ऑनलाइन वर्कशॉप चे उद्घाटक प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्हि. गिरी!!*

मेढा, दि. २० जून २०२६ : जयवंत प्रतिष्ठान, हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा, दूधसाखर महाविद्यालय, बिद्री (कोल्हापूर) आणि कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक (कराड) यांच्या संयुक्त विद्यमाने "NET/SET Guidance in Library & Information Science Paper-II" या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी करण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना NET/SET परीक्षेचे महत्त्व, सातत्यपूर्ण अभ्यासाची आवश्यकता आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रातील नव्या संधी यांविषयी विचार मांडले. तसेच नॅशनल ऑनलाईन वर्कशॉप घेण्यासाठी जयवंत प्रतिष्ठान, हुमगावचे अध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब व सचिव वैशाली शिंदे मॅडम यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभते असे संबोधिले. याप्रसंगी दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय डी. पाटील तसेच कृष्णा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत साळुंखे प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.अतुल रामदास नगरकर (ग्रंथपाल, DMB) यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी NET/SET पेपर-II मधील विविध घटक, अभ्यासक्रमाचे स्वरूप, प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, अभ्यासाची प्रभावी रणनीती, वेळेचे व्यवस्थापन तसेच यशस्वी तयारीसाठी आवश्यक असलेल्या विविध टिप्स सहभागींसमोर मांडल्या. त्यांच्या सुस्पष्ट आणि उदाहरणाधारित मार्गदर्शनाचा लाभ देशभरातील NET/SET इच्छुक विद्यार्थी, संशोधक आणि ग्रंथालय व्यावसायिकांनी घेतला.

कार्यशाळेचे संयोजन डॉ. सुधीर रामदास नगरकर (ग्रंथपाल व असोसिएट प्रोफेसर, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा) यांनी केले. तसेच श्री. अमोल थोरात (ग्रंथपाल, कृष्णा महाविद्यालय, रेठरे बुद्रुक) यांनी सहसंयोजक म्हणून कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.

देशातील विविध राज्यांमधून मोठ्या संख्येने NET/SET परीक्षार्थी, संशोधक, प्राध्यापक आणि ग्रंथालय व्यावसायिक सहभागी झाले होते. सहभागींकडून कार्यशाळेबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मार्गदर्शन सत्रानंतर उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवर, प्रमुख मार्गदर्शक, सहभागी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार श्री अमोल थोरात यांच्याकडून मानण्यात आले. ही कार्यशाळा NET/SET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरल्याची भावना सहभागीांनी व्यक्त केली.

Wednesday, 11 March 2026

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा.येथे जागतिक महिला दिनानिमित्त गुणी व कर्तृत्वान माजी विध्यार्थीनीचा सन्मान* ============================दिनांक:- १०मार्च,२०२६
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिन आनंदी वं उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत चोरांबेचे सरपंच श्री.विजय सपकाळ हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गिरी होते. याप्रसंगी विचारमंचावर डॉ. सुषमा सपकाळ,तुषार सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीस रोपट्यास पाणी घालून उदघाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे श्री.विजय सपकाळ यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांना संबोधित करताना स्त्रियांविषयी समाजात  केला जाणारा भेदभाव,अन्याय व अत्याचार या बाबींना कठोर विरोध करणे आवश्यक असल्याचे सांगितले.महिलांविरुद्ध केला जाणारा भेदभाव, अन्याय व अत्याचार याविषयी आवाज उठविणे.आरोग्य शिक्षण आणि रोजगार यासाठी महिलांचे प्रबोधन करणे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. “ असे सांगून त्यांनी महाविद्यालयाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी म्हणाले की,” स्त्रीशक्तीचा सन्मान, कर्तृत्व आणि समानतेचा उत्सव आहे. हा दिवस महिलांच्या संघर्षाची जाणीव करून देत, त्यांना सक्षम  करण्यासाठी प्रेरित करतो. समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोलाचे असून, त्यांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी आणि आदर देणे ही काळाची गरज आहे तसेच महिलांचे सक्षमीकरण करणे ही समाजाची सामुहिक जबाबदारी आहे.महिला सक्षमीकरणाची सुरवात आपल्या घरापासूनच होणे आवश्यक आहे.म्हणूनच आपल्या घरातील मुली व महिलांना समाजात योग्य सन्मान देऊन त्यांना सक्षम करण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत”  असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय धोंडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सन्मान पत्राचे वाचन प्रा.सौ.गायत्री जाधव यांनी केले.. 
प्रारंभी या कार्यक्रमास निमंत्रित केलेल्या चोरांबे येथील उच्च शिक्षित महिला ज्यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाची नॅनो सायन्स मध्ये पीएच.डी पदवी प्राप्त झाली आहे त्या डॉ.सौ.सुषमा सपकाळ यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.त्यानंतर प्राणिशास्त्र विभागाची कु.नेहा जुनघरे हिने सेट ( राज्य पात्रता चाचणी परीक्षा ) उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच महाविद्यालयातील एन.एस. एस, क्रीडा, सांस्कृतिक विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विध्यार्थिनी आणि महिला प्राध्यापिका यांचा उचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आनंद साठे  यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ.बाळासाहेब उघडे,श्री.जगदीश ओंबळे तसेच एन.एस.एस.चे स्वयंसेवक विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी व विध्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.विनोद पवार यांनी आभार मानले.

Tuesday, 20 January 2026

लोक महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते - डॉ. राजेश मिरगे **

*लोक महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख हे समग्र समाजक्रांतीचे प्रणेते - डॉ. राजेश मिरगे **
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा आणि श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने  डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत आयोजित केलेला विशेष व्याख्यान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेतील पहिले पुष्प आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात गुंफण्यात आले. यावेळी अमरावती येथील संत साहित्याचे अभ्यासक तथा इतिहास विश्लेषक डॉ. राजेश मिरगे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रकाश टाकला डॉ.पंजाबराव देशमुख हे भारतीय कृषी क्रांतीचे प्रणेते  आहेत.  देशाच्या शैक्षणिक विकासातील  एक अग्रगण्य व्यक्ती  आहेत. देशाच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी,आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. याबरोबरच भारतीय संविधानामध्ये  त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे .शाहू ,फुले  आणि आंबेडकर या युगपुरुषांच्या कार्याप्रमाणेच  पंजाबराव देशमुख यांनी  केलेले कार्य आजच्या पिढीला माहित असणे गरजेचे आहे.बहुजन समाजाचा सर्व क्षेत्रात विकास व्हावा  हे त्यांचे स्वप्न होते. शेती हा आपल्या देशाचा आत्मा आहे. त्यामुळे शेती आणि शेतकर्‍यांचा विकास हे त्यांचे स्वप्न होते असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रारंभी श्री. शिवाजी शिक्षण संस्था संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथील प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी प्रास्ताविकात ही व्याख्यान माला आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी यांनी  डॉ. पंजाबराव देशमुख  यांच्या  सारख्या महापुरुषांना समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा युवा पिढीने घेऊन स्वतःच्या तसेच समाजाच्या व देशातील ग्रामीण भागातील व प्रामुख्याने अविकसित प्रदेशातील नागरिकांच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित करावे असे प्रतिपादन केले. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. प्रमोद घाटगे हे या प्रसंगी उपस्थित होते.प्रा.शंकर गेजगे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रा.सौ. गायत्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय धोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियोजनपूर्वक व सातत्यपूर्ण अभ्यास तसेच सुयोग्य मार्गदर्शन हेच नेट/ सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक मूलमंत्र: नॅशनल ऑनलाइन वर्कशॉप चे उद्घाटक प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्हि. गिरी!!*

*नियोजनपूर्वक व सातत्यपूर्ण अभ्यास तसेच सुयोग्य मार्गदर्शन हेच नेट/ सेट परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक मूलमंत्र: नॅशनल ऑनलाइ...