Saturday, 27 September 2025

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे शारदीय नवरात्र उत्सवा निमित्ताने विद्यार्थ्यांना साठी आनंद सोहळ्याचे आयोजन*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे शारदीय नवरात्र उत्सवा निमित्ताने विद्यार्थ्यांना साठी आनंद सोहळ्याचे आयोजन*

मेढा . दि . २५ सप्टेंबर रोजी मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य मा . मेजर डॉ अशोक व्हि गिरी यांच्या पुढाकाराने तीन वर्षां पासून विद्यार्थ्यांना आपल्या प्राचीन सण, समारंभ व *विद्यार्थ्यांच्या विविध कला, गुणांना योग्य व्यासपीठ मिळावे* यासाठी सुरू केलेली नवरात्र उत्सवाची परंपरा कायम आहे .विद्यार्थीच्या सहभागातून सुरु असलेल्या या अनोख्या परंपरेत विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात सहभागी होतात . यावेळी घटस्थापनेच्या मुहूर्तावर आकर्षक सजावट व विजेच्या रोषणाई मध्ये आई अंबाबाईच्या प्रतिमेचे पूजन करून नियमित सर्व विद्यार्थी व विविध मान्यवरांच्या हस्ते आरती केली जाते .यानंतर चार दिवसांमधे विविध महाराष्ट्रीयन संस्कृतीची परंपरा जोपासणे व मुलांच्या विविध कला गुण कौशल्यांचा विकास करण्याच्या हेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते .यावेळी मुली नववारी साडी परिधान करून *मंगळागौर ,भोंडला, झिम्मा - फुगडी याचबरोबर अनेक पारंपारिक लोकनृत्य व गीते यावर नाच करत आपल्या कला संस्कृतींचे दर्शन घडवतात* . याबरोबर *मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व विविध स्पर्धामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. यावेळी रोज कार्यकमां साठी विविध मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक करतात . याचबरोबर मुले विविध प्रकारच्या फनी गेम मध्ये सहभागी होतात याचबरोबर *रोज कार्यक्रमाच्या समारोपाला रास दांडीयाचे आयोजन करून मुले व मुली स्वतंत्र गोल राऊंड करून दांडीया खेळतात*.
शेवटच्या दिवशी सर्व विविध प्रकारच्या स्पर्धांमधून व खेळांमधून प्रथम तीन क्रमांक काढून त्यांना ट्रॉफी व मेडल देऊन त्यांचे महाविद्यालय व संस्थेच्या वतीने कौतुक केले जाते . हा विविध प्रकारच्या स्पर्धांचा व भरगच्च अशा विविध गुण दर्शन कार्यकमाच्या आनंदसोहळाचा समारोप गुरुवारी संपन्न झाला .
या समारोपाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ अशोक व्हि गिरी उपस्थित होते त्यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख व संस्कृतीचे रक्षण, आपल्या प्राचीन परंपरा, लोककला, धार्मिक परंपरा यांचे जतन व्हावे . नवीन पिढीला याबाबत माहिती व्हावी .हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे आवर्जून प्रतिपादन केले त्याचबरोबर आपण आपल्या संस्कृतीतील या परंपरा पुढच्या पिढीला सांगावयाच्या असतील तर असे कार्यक्रम संपूर्ण राज्यभर व देशभर आयोजीत केले गेले पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त केली . यावेळी विजेत्या सर्व स्पर्धकांना प्राचार्य यांच्या हस्ते बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभागाचे मुख्य समन्वयक प्रा . संतोष कदम यांनी केले. महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ प्रमोद घाटगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रीमती संध्या पोळ यांनी केले . तर आभार श्रीमती अनुराधा जाधव मॅडम यांनी माणले . या कार्यक्रमाला आर्थिक सहकार्य बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेढा यांचे वतीने करण्यात आले तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्था अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब संस्था सचिव मा. वैशाली शिंदे मॅडम यांनी आयोजित महोत्सवास आवर्जून शुभेच्छा दिल्या. याशिवाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील उप समन्वयक प्राध्यापिका सौ . सुषमा काळे व सर्व प्राध्यापक वर्ग तसेच एन एस एस विभाग प्रमुख डॉ . संजय धोंडे, प्राध्यापक श्री विनोद पवार ,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. श्री अतुल तिडके सर व सर्व सदस्य, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी संपूर्ण कालावधीत देवीची आकर्षक रोशणाई व सजावट केली . याशिवाय महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले .

No comments:

Post a Comment

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न **

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न ** आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढ...