Wednesday, 24 September 2025

राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमातून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व जबाबदारी चे उत्तरदायित्व घेण्याचे शिक्षण मिळते*

*राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमातून विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार व जबाबदारी चे उत्तरदायित्व घेण्याचे शिक्षण मिळते* 
*बाळासाहेब शिंदे - समन्वयक, नाम फाउंडेशन, पश्चिम महाराष्ट्र* 
मेढा - दि.२४, सप्टेंबर रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाम फाउंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, श्री.बाळासाहेब शिंदे यांना निमंत्रित केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयीन शिक्षणातील योगदान या विषयावरील आपले विचार मांडले. समाजाशी खरे नाते जोडण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून होते. समाजाची खरी पारख होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक असणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शिक्षणातून ज्ञान मिळते आणि राष्ट्रीय सेवा उपक्रमातून जीवनाच्या वास्तवतेची जाणीव होते. एक जबाबदार व्यक्तिमत्व आणि उत्तम नेतृत्व निर्माण करून बलशाली राष्ट्राची उभारणी करण्याची खरी ताकद राष्ट्रीय सेवा योजनेे सारख्या उपक्रमात आहे.म्हणूनच स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत आखलेल्या देशाच्या सर्व शैक्षिणक धोरणांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाचा समावेश अनिवार्य केलेला आहे. असे आपल्या मनोगतातून त्यांनी विचार व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक.व्ही.गिरी यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सांगितले की,विद्यार्थ्यांनी शिकत असताना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी तसेच आपण समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहोत व समाजाप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या असतात कर्तव्ये असतात या गोष्टीचे संस्कार विद्यार्थी दशेत जाणीवपूर्वक होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.यावेळी ठाणे येथील प्रश्न फाउंडेशनचे सातारा जिल्हा समन्वयक श्री.रजत नवले आणि महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे तसेच नवसंजीवन जलसंवर्धन सामाजिक संस्था आलेवाडीचे सदस्य श्री.नवनाथ बिरामणे आणि श्री.विठ्ठल पवार हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय धोंडे यांनी केले. प्रा.प्रकाश जवळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विनोद पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच प्रा. सौ. धनश्री देशमुख आणि प्रा. शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व एन.एस.एस. समिती सदस्य,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न **

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न ** आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढ...