डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “
प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी.
•••••••••••••••••••••••••••••••
“ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शिक्षण, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यांवर आधारित होते, ज्यात 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ' ही त्यांची मुख्य शिकवण होती.त्यांनी जातिभेद निर्मूलन, महिला सक्षमीकरण,कामगार हक्क आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “ असे मत प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी यांनी व्यक्त केले.जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते.
प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर पुढे म्हणाले,"डॉ.आंबेडकर यांचे विचार गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने प्रेरित होते, ज्यात शिक्षणाला वाघिणीचे दूध मानले गेले आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यावर भर दिला गेला. त्यांच्यामते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,असे ते म्हणाले. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत असावा यावर त्यांचा भर होता.जाती-आधारित भेदभावामुळे दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला आणि सामाजिक न्यायाची मागणी केली.त्यांनी लोकांना संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले, याशिवाय त्यांनी देशातील सर्वच स्त्रियांच्या हक्कांसाठी अथक प्रयत्न केले, त्यांचे शिक्षण आणि सामाजिक स्थान उंचावण्यासाठी त्यांनी कार्य केले.ते गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांना आपले गुरु मानत होते.या महामानवांचा विचार प्रमाण मानला. ते स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी न्याय, समता आणि बंधुतेवर आधारित लोकशाहीची स्थापना केली.असे सांगून प्राचार्य डॉ. अशोक गिरी सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या बुद्धिमत्तेचा विकास केला आणि देशातील दिन- दलित,आदिवासी, स्त्रिया व सर्व भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, न्याय हे मूलभूत अधिकार व हक्क बहाल केले. “ कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय धोंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी राज्यशास्त्र विभाग प्रमुख सौ.गायत्री जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
================
No comments:
Post a Comment