Tuesday, 11 January 2022

शिक्षण

शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे, शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावयाचा आहे.

Monday, 10 January 2022

Interlibrary Loan

Interlibrary loan (abbreviated ILL, and sometimes called interloaninterlendingdocument deliverydocument supply, or interlibrary services, abbreviated ILS) is a service whereby a patron of one library can borrow books, DVDs, music, etc. and/or receive photocopies of documents that are owned by another library. The user makes a request with their home library; which, acting as an intermediary, identifies libraries with the desired item, places the request, receives the item, makes it available to the user, as well as arranges for its return. The lending library usually sets a due date and overdue fees of the material borrowed. Although books and journal articles are the most frequently requested items, some libraries will lend audio recordings, video recordings, maps, sheet music, and microforms of all kinds. In some cases, nominal fees accompany the interlibrary loan services.

The term document delivery may also be used for a related service, namely the supply of journal articles and other copies on a personalized basis, whether these come from other libraries or direct from the publishers. The end user is usually responsible for any fees, such as costs for postage or photocopying. Commercial document delivery services will borrow on behalf of any customer willing to pay for their rates.

Sunday, 9 January 2022

कोशिश करने वालों की कभी हार नही होती!!!!!

कई लोग इस रचना को हरिवंशराय बच्चन जी द्वारा रचित मानते हैं। लेकिन श्री अमिताभ बच्चन ने अपनी एक फ़ेसबुक पोस्ट में स्पष्ट किया है कि यह रचना सोहनलाल द्विवेदी जी की है।

लहरों से डर कर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है
मन का विश्वास रगों में साहस भरता है
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है
जा जाकर खाली हाथ लौटकर आता है
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

असफलता एक चुनौती है, स्वीकार करो
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम
कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती!!!


Reference

http://kavitakosh.org/kk/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%82_%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%82_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80_/_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80




Saturday, 8 January 2022

Inspirational Thought

"वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यानि शिल्लक ठेवलेले असते"

- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

Friday, 7 January 2022

कोहा - ग्रंथालयांसाठी ओपन सोर्स सोफ्टवेअर


 

कोहा - ग्रंथालयांसाठी ओपन सोर्स सोफ्टवेअर

 

Dr.Sudhir Nagarkar

 

M.A.,M.Lib.& I.Sc.,M.Phil.,SET,NET,Ph.D.

 

Librarian,

Amdar Shashikant Shinde Mahavdiyalaya Medha Satara

 

Cell No.9096572888 email : nagarkarsr@gmail.com

 

मागील  पंचवीस  वर्षांत ग्रंथालयातील बदल झपाटय़ाने झालेले आढळत आहेत. हे बदल मुख्यत: ग्रंथालय आधुनिकीकरणाचे आहेत. ग्रंथालयाचे स्वरूप, कार्यपद्धती, सेवासुविधा, वाचन साहित्य आणि वाचकांच्या अपेक्षा यात खूप फरक पडलेला जाणवत आहे. तंत्रज्ञानाचा विशेषत: संगणकीय तंत्रज्ञानाचा प्रभाव छोटय़ा मोठय़ा साऱ्याच गोष्टींवर पडलेला दिसतो. बदललेल्या या साऱ्या कार्यपद्धतीला काळ, श्रम, पैसा आणि जागा यांचे निकष लावून तपासले तर या साऱ्या बदलांचे गांभीर्य सहज दिसून येते.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक परिमाण बदलतो हे जरी खरे असले तरी काही शाश्वत मूल्ये ही नेहमीच साऱ्या बदलांना आणि तंत्रज्ञानाला दिशादर्शक ठरली आहेत हे सुद्धा तितकेच सत्य आहे.

 

एकविसाव्या शतकाचा पाया समजल्या जाणाऱ्या संगणकीय तंत्रज्ञानातही एक चळवळ अशीच निर्माण झाली ती म्हणजे ओपन सोर्स सॉफ्टवेअरची. १९८३ ला ती सुरू झाली ती फ्री सॉफ्टवेअर या नावाने. १९९८ च्या दरम्यान फ्री सॉफ्टवेअरचे नाव बदलून ओपन सोर्स सॉफ्टवेअर ठेवले गेले. त्यामुळे बाजारी अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला. ओपन सोर्स म्हणजे एखादे सॉफ्टवेअर समजून घेऊन कोणीही विकसित करू शकतो. त्यात बदल, सुधारणा करू शकतो आणि अन्य समविचारी लोकांसमवेत ते वापरू शकतो. त्याचा प्रसार करू शकतो. यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही की पैसे मोजावे लागत नाही. याला विरुद्ध अर्थ म्हणजे खासगी मालकी हक्क (कॉपी राइट) असलेली पेटंट मिळवून ती विकून प्रचंड नफा मिळवणारी खासगी सॉफ्टवेअर्स (उदा. मायक्रोसॉफ्ट). ओपन सोर्समध्ये वापराचा परवाना/ संकेत कोड सर्वासाठी खुला असतो. त्यामुळे त्याचा वापर अथवा त्यात सुधारणा कोणीही करू शकतो. त्यावर कोणाचेही र्निबध असत नाहीत. यात जगभरातील समविचारी संगणक तंत्रज्ञ विविध क्षेत्रांत उपयोगी पडणारी ग्रंथालय सॉफ्टवेअर्स सर्वाना खुल्या वापरासाठी उपलब्ध करून देतात. त्यासाठी आपापल्या परीने योगदान देतात आणि तंत्रज्ञानामुळे होणारी आर्थिक सुबत्ता असणारे व नसणारे या वर्गातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करतात.
ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणात संगणकीय तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, यात शंकाच नाही. अनेक प्रकारची माहिती, सहस्र नोंदी आणि सुविधा यात एकसूत्रता आणणे सहजशक्य झाले. ग्रंथालयीन सेवक आणि वाचकांचेही श्रम, वेळ आणि पैसा वाचवून सेवा सुविधा तत्परतेने पुरविण्यात हातभार लावला जात आहे. त्यामुळे बदलत्या काळाच्या आणि वाचकांच्या अपेक्षांना सामोरे जाण्यास ग्रंथालये सज्ज होऊ लागली. मात्र ग्रंथालयाच्या बाबतीत विविध खासगी सॉफ्टवेअर्स बाजारात एकामागून एक येऊन त्यांची स्वतंत्र संस्थाने निर्माण झाली. त्यांच्यात जरी स्पर्धा निर्माण झाली तरी या साऱ्यांमध्ये एकसूत्रीपणाचा अभाव होता. त्यामुळे ग्रंथपाल तसेच ग्रंथालये यात संभ्रम निर्माण होऊ लागला. किमतीमध्ये जशी विविधता आणि उंची असते  तशी प्रमाणिकरणात मात्र नसते . ग्रंथालयांतील परस्पर सहकार्याच्या मूळ तत्त्वाला बाधा येऊ लागली. फायद्याच्या मागे लागल्याने ग्रंथपाल किंवा ग्रंथालये यांच्या गरजांची पूर्तता  खासगी कंपन्या कडून होऊ शकत नाही. नव्या सुधारित आवृत्तीची, नवी अवाढव्य किंमत आणि नव्या सुधारणा जुन्या ग्राहकाला पुन्हा विकत घ्याव्या लागल्या. त्यामुळे पैसे विनाकारण पुन: पुन्हा खर्च करावे लागले आणि आर्थिक खर्चाचा नवा ताण ग्रंथालयावर पडू लागला. या आणि अशा अनेक समस्यांवर उत्तर म्हणून ओपन सोर्सकडे ग्रंथालय क्षेत्रातील व्यावसायिक वापरू लागले आहेत .
कोहा हे ग्रंथालयांसाठी विकसित केले गेलेले पहिले र्सवकष ओपन सोर्स सॉफ्टवेअर. कोहाची सुरुवात १९९९ मध्ये झाली. न्यूझीलंडमधील होरोव्हेनुआ लायब्ररी ट्रस्टसाठी क्याटिपो कम्युनिकेशन कंपनीने विकसित केले. जानेवारी २००० मध्ये ते प्रथम वापरात आले. २००१ मध्ये फ्रान्सच्या पॉल पॉलिनने कोहामध्ये आणखी सोयीसुविधा आणल्या, त्यात मुख्य म्हणजे विविध भाषांचा वापर करण्याची क्षमता. कोहा आता अनेक भाषांमध्येही उपलब्ध आहे. अगदी चीनी, अरबी आणि मराठी अशा जगातील कानाकोपऱ्यातील भाषा आता सहजपणे याचा वापर करीत आहे.
२००५ मध्ये अमेरिकेत कोहा अधिक विकसित करण्यासाठी ओहिओमध्ये लाईबलाईम नावाची कंपनी निर्माण झाली. त्यांनी विकसित केलेल्या झेब्रा सुविधेमुळे कोहामध्ये करोडो पुस्तकांच्या अधिकृत आणि प्रमाणित नोंदी संदर्भासाठी सहज उपलब्ध होऊ लागल्या. अन्य कंपन्यांमध्ये उल्लेख करण्यासारखी नावे म्हणजे कॅलिफोर्नियातील बायवाटर सोल्यूशन आणि मेरिलंडमधील पीटीएफएस इंक. भारतातही बंगलोर आणि मुंबईस्थित न्यूकसॉफ्ट कंपनीची ओएसएस ल्याब्स (osslabs.biz) आघाडीवर आहे. भारतातील विविध भाषांचा वापरही यात आता सहजपणे करता येणे शक्य झाले आहे.
जगभरात हजारांहून अधिक ग्रंथालये कोहाचा वापर करीत आहेत. यात मान्यवर संस्था आहेत. युनेस्कोच्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या ग्रंथालयासाठीही कोहाचा वापर अप्रतिम केला जात आहे. भारतात पाहायचे झाले तर आईआईएम, अहमदाबाद आणि दिल्ली पब्लिक लायब्ररीसारख्या अनेक मातब्बर संस्था कोहाचा वापर त्यांची ग्रंथालये सुसज्ज आणि आधुनिक करण्यासाठी करू लागली आहेत. केरळ राज्यामध्ये तर सार्वजनिक ग्रंथालयास कोहा सोफ्टवेअर अनिवार्य करण्यात आले आहे. जगात सर्वात जास्त युजर फ्रेंडली सोफ्टवेअर म्हणून कोहा चा वापर ग्रंथालयात केला जात आहे. आपल्या ग्रंथालयाम्ध्ये कोहा सोफ्टवेअर वापरावयाचे असल्यास ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर (9096572888) संपर्क साधावा.


कोहा  सोफ्टवेअरची  वैशिष्टय़े 


१. ग्रंथालयासाठी आवश्यक असलेली अधिकात अधिक माहिती संघटन सुविधा कोहामध्ये आढळते.
१. वाचक आणि ग्रंथालय सेवकांच्या वापरासाठी साधा-सोपा आणि आकर्षक इंटरफेस आहे..
२. माहिती आणि नोंदीचा विविध अंगाने शोध घेण्याची सुविधा कोहा मध्ये आहे.
३. पुस्तके देवघेवीसाठी तसेच वाचक नोंदीसाठी सुविधा आहे.
४. पुस्तकांच्या सविस्तर कॅटलॉग नोंदीसाठी मार्क २१ च्या आधारावर सुविधा आहे .
५. ओनलायिन सर्वर मुळे लायब्ररी ऑफ काँग्रेससारख्या मोठय़ा ग्रंथालयाच्या कॅटलॉगमधून अधिकृत नोंदी तयार मिळविता येतात.
६ वाचनसाहित्य खरेदीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याची सोय आहे (यात पुस्तक विक्रेते आणि परदेशी चलनाचीही नोंद ठेवली जाते ).
७.    मोठय़ा ग्रंथालयांसाठी जशी अनेक सुविधांनी युक्त तशीच छोटय़ा ग्रंथालयांसाठी साधीसोपी व्यवस्थाही पुरविली जात आहे.
८. एखाद्या ग्रंथालयाच्या जर अनेक शाखा असतील (उदा. सार्वजनिक ग्रंथालये) तर त्यांचेही नियंत्रण करण्यासाठी व्यवस्था आहे. उदा. सर्व शाखांतील वाचक, वाचन साहित्य, अंदाजपत्रके, सोयीसुविधा या सर्वावर देखरेख ठेवता येते.
९.    मासिके नियतकालिके आणि वृत्तपत्रे यांचे व्यवस्थापन सोप्या पद्धतीने केले जात आहे .
१०. वाचकांच्या मागणीचा आढावा घेऊन अहवाल निर्माण करणे आणि अनेक निगडित सुविधा आढळतात.

१२. ग्रंथालयास आवश्यक असणारे सर्व प्रकारचे रिपोर्ट्स मिळण्यासाठी कोहा हे सक्षम सोफ्टवेअर आहे

 

 

 

 

जगात अशक्य काहीच नसतं.

आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.