Sunday, 23 January 2022

नेताजी सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस (बंगाली: সুভাষ চন্দ্র বসু) (जानेवारी २३इ.स. १८९७ - ऑगस्ट १८इ.स. १९४५) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते.

सुभाषचंद्र बोस
Subhas Chandra Bose.jpg
सुभाषचंद्र बोस
टोपणनाव:नेताजी
जन्म:२३ जानेवारी १८९७
कटकओडिशाभारत
मृत्यू:१८ ऑगस्ट१९४५ (वय ४८)
तैहोकोतैवान
चळवळ:भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:अखिल भारतीय काँग्रेस
फॉरवर्ड ब्लॉक
आझाद हिंद फौज
प्रमुख स्मारके:पोर्ट ब्लेर येथील स्मारक
धर्म:हिंदू
पत्नी:एमिली शेंकल
अपत्ये:अनिता बोस फफ

नेताजी असे त्यांना प्रथम १९४२ च्या सुरुवातीस जर्मनीमध्ये भारतीय सैनिकांनी आणि बर्लिनमधील भारताच्या विशेष ब्यूरोमधील जर्मन आणि भारतीय अधिका-यांनी म्हणायला सुरू केले. आता त्यांना संपूर्ण भारतात नेताजी म्हटले जाते.[१][२]

सुभाष बोस यांचा जन्म ओरिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता. भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. परीक्षेत ते यशस्वी झाले, परंतु राष्ट्रवाद हा उच्च दर्जाचा असल्याचे कारण देत त्यांनी अंतिम परीक्षा दिली नाही. महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी चळवळीत सामील होण्यासाठी 1921 मध्ये भारतात परत आले. बोस हे जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व असलेल्या गटात गेले. हा गट घटनात्मक सुधारणेसाठी कमी उत्सुक होता आणि समाजवादासाठी अधिक खुला होता. 1938 मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1939 मध्ये पुन्हा निवडून आल्यावर त्यांच्यात आणि गांधींमध्ये मतभेद झाले. काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी गांधींना पाठिंबा दिला. त्यानंतर बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.[३][४]

एप्रिल 1941 मध्ये बोस नाझी जर्मनीमध्ये पोहोचले. बर्लिनमध्ये फ्री इंडिया सेंटर उघडण्यासाठी जर्मन निधी वापरण्यात आला. बोसच्या नेतृत्वात एर्विन रोमेलच्या आफ्रिका कॉर्प्सने ताब्यात घेतलेल्या भारतीय युद्धकौशल्यांपैकी 3,000-बलवान फ्री इंडिया लीजनची भरती करण्यात आली होती. एडॉल्फ हिटलरने मे 1942 च्या उत्तरार्धात बोस यांच्याशी झालेल्या एकमेव भेटीत पाणबुडीची व्यवस्था करण्याची ऑफर दिली. याच काळात बोस हे वडीलही झाले[५][६]; त्यांची पत्नी, किंवा सोबती, एमिली शेंकल यांनी एका मुलीला जन्म दिला. नंतर बोस एका जर्मन पाणबुडीवर चढले. त्यांची एका जपानी पाणबुडीत बदली करण्यात आली जिथून तो मे 1943 मध्ये जपानच्या ताब्यातील सुमात्रा येथे उतरले.[५][७] जपानच्या पाठिंब्याने, बोस यांनी आझाद हिंद सेनेमध्ये सुधारणा केली, ज्यात ब्रिटिश भारतीय सैन्याच्या युद्धातील भारतीय कैद्यांचा समावेश होता.[८] जपानी-व्याप्त अंदमान आणि निकोबार बेटांवर मुक्त भारताचे तात्पुरते सरकार घोषित करण्यात आले आणि त्याचे प्रमुख बोस होते.

जरी बोस असामान्यपणे आणि करिष्माई होते, तरी जपानी लोक त्यांना लष्करीदृष्ट्या अकुशल मानत होते[९], आणि त्यांचा सैनिकी प्रयत्न अल्पकाळ टिकला. 1944 च्या उत्तरार्धात आणि 1945 च्या सुरुवातीस, ब्रिटीश भारतीय सैन्याने भारतावरील जपानी हल्ला परतवून लावला. जवळजवळ अर्धे जपानी सैन्य आणि सहभागी आझाद हिंद सेनेची तुकडी बळी गेली.[१०] बोस यांनी सोव्हिएत युनियनमध्ये भविष्य शोधण्यासाठी मंचुरियाला पळून जाण्याचा निर्णय घेतला.

18 ऑगस्ट 1945 रोजी जपानी तैवानमध्ये त्यांचा विमानाचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.[११][१२] काही भारतीयांना या अपघातवर यावर विश्वास बसला नाही, बोस भारताचे परत येतील अशी अपेक्षा ते करत होते.[१३]

भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बोस यांच्या देशभक्तीची नेहमीच प्रशंसा केली परंतु त्यांच्या रणनीती आणि विचारसरणीपासून स्वतःला दूर केले. ब्रिटिशांची राजवट आझाद हिंद सेनेमुळे कधीही धोक्यात आली नाही.[१४][१५] ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेच्या 300 अधिकार्‍यांवर देशद्रोहाचा आरोप लावला, पण अखेरीस काँग्रेसच्या विरोधामुळे ब्रिटिश मागे सरले.[१६][१०]


Reference : https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8

Saturday, 22 January 2022

रिच_डॅड_पुअर_डॅड

#रिच_डॅड_पुअर_डॅड

धन , संपत्ती जोडवी कशी या काळात याचे मार्गदर्शन करणारे सर्वोत्कृष्ट पुस्तक!

ओन ऑफ द बेस्ट सेलर बुक:Rich Dad Poor Dad मराठीत/हिंदी/इंग्रजीमध्ये

वैयक्तिक अर्थकारण वरील सर्वकालीन नंबर १ चे पुस्तक!

करोडो प्रती जगभर विकल्या गेल्या आणि विकल्या जात आहेत.

हजारो लोकांचे जीवनमान बदलून टाकणारे पुस्तक!

नक्की वाचावे...
किमान खालील वेगवेगळ्या मंडळींची रिव्ह्यू वाचावेत!

पुस्तकाचे नाव: रीच डॅड पुअर डॅड (मराठी)

लेखक:रॉबर्ट टी. कियासोकी

पेज:३०५

मूल्य:399/ सवलत मूल्य:३६०/ टपाल:३५/ एकूण:३९५/

संपर्क: रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी

9421605019

#व्हॉटसअप_करून_संपर्क_साधावा.

 "बेस्ट  वैयक्तिक अर्थकारणावरचे सर्वाकालीन क्र.1  चे पुस्तक !"

पैशांबाबतच्या अशा गोष्टी ज्या श्रीमंत आपल्या मुलांना शिकवतात, गरीब व मध्यमवर्गींय शिकवत नाहीत.

 रिच डॅड पुअर डॅड-  रॉबर्ट टी. कियोसाकी या इंग्रजी लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद अभिजित थिटे यांनी केला आहे.

 जागतिक कीर्तीच्या लेखकांनी प्राध्यापकांनी व व्याख्यात्यांनी वाचून दोन  ओळीत आपले अभिप्राय लिहिले आहेत त्यातील एक अभिप्राय --

• आर्थिक परिस्थिती सुधरण्याची इच्छा असेल तर रिच डॅड , पुअर डॅड अवश्य वाचा तुमच्या आर्थिक भविष्यासाठी आणि बाजारपेठेच्या अभ्यासाठी ते उपयुक्त आहे.
--झिग झिगलर --जागतिक कीर्तीचे लेखक आणि व्याख्याते

• श्रीमंत कसं व्हायचं आणि असेलेलं कसं टिकवून ठेवायचं, या विषयीची साद्यंत माहिती , खरंतर शहाणपण हवं असेल तर हे पुस्तक अवश्य वाचा !! सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलानांही वाचायला लावा त्यासाठी गरज पडल्यास त्यांना लाचही द्यायला हरकत नाही. --मार्क व्हिक्टर हनसन -सहलेखक, न्यूयॉर्क टाइम्स चिकतन सूप फॉर द सोल)
 
• रिच डॅड पुअर डॅड- हे  काही पैशांविषयीच्या इतर पुस्तकांसारखं नाही . एकतर हे वाचायला सोपं आहे आणि त्यातील महत्वाचे संदेशही सहजपणे उमगतील इतक्या सोप्या भाषेत आहेत.

• मी तरुण असताना हे पुस्तक वाचायला हवं होतं किंवा खरंतर माझ्या पालांनीच हे पुस्तक वाचणं जास्त उपयुक्त ठरलं असतं. तुम्हांला जितकी तुलं आहे त्या प्रत्येकाला हे पुस्तक विकत घेऊन द्या.
 नातवंडासाठीही काही प्रती खरेदी करुन ठेवा . मूल 8-9 वर्षाचे झालं की त्याला हे पुस्तक भेट म्हणून दयायलाच हवं.--(स्यू ब्रॉन-अध्यक्ष , टेनंट चेक ऑफ अमेरिका )

• रिच डॅड पुअर डॅड- हे पुस्तक म्हणजे चटकन श्रीमंत होण्याचा मंत्र नाही. हे पुस्तक तुम्हांला तुमच्या आर्थिक बाबी जबाबदारीनं कशा हाताळायच्या हे सांगतं.पैशावर प्रभुत्व मिळवून मालमत्ता वाढवायला हे पुस्तक शिकवतं. तुम्हांला तुमची आर्थिक बुध्दिमत्ता वाढवायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. (डॉ.एड कोकेन--अर्थशास्त्राचे प्राध्यापक , आरएमआयअी विद्यापीठ, मेलबोर्न)
 
• हे पुस्तक मी वीस वर्षापूर्वीच वाचायला हवं होतं. --लेरीस क्लर्क -(डायमंड की होम्स, आयएनसी मॅगझीननं यांना १९९५ साली अमेरिकेतील सर्वात वेगानं वाढणारी कंपनी अशी मान्यता दिली आहे.)

• आपल्या आर्थिक भविष्यावर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करणा-या सर्वांसाठी रिच डॅड पुअर डॅड- ही प्राथमिक पायरी आहे. ---यूएसएटुडे

• हे पुस्तक आपल्या मुलाचे सर्वोत्तम शिक्षक असणा-या सा-या आई-बाबांनाच अर्पण .

• रिच डॅड पुअर डॅड-  काय करेल? श्रीमंत होण्यासाठी खूप उत्पन्न मिळवावं लागतं हा समज उधळून लावेल.

• तुमचं घर ही तुमची मालमत्ता आहे . या समाजाला आव्हान देईल.

• पैशांबद्दलचं शिक्षण मुलाला  मिळण्यासाठी शाळेवर अवलंबून राहणं चुकीचं आहे. हे पालाकंना दाखवून देईल.

• मालमत्ता आणि कर्ज यांची एकदाच व्याख्या करुन देईल.

• मुलांना त्यांच्या भावी आर्थिक यशासाठी पैशांबद्दल काय शिकवावं लागेल ते तुम्हांला शिकवेल.
 
• जगभरातील अब्जावधी लोकांच्या पैशाबद्यल विचार करण्याच्या पध्दतीला रॉबर्ट कियोसांकीनी आव्हान दिले व ती बदलून टाकली. रुढीबध्द शहाणपणाला सहसा छेद देणा-या दृष्टिकोनामुळे . रॉबर्ट यांची सडेतोड बोलण्याबद्दल परखडपणाबद्दल व धीटपणाबद्दल प्रसिध्दी आहे. आर्थिक्‍ शिक्षणाचे तळमळीचे पुरस्कर्ते म्हणून जगभर त्यांना ओळखले जाते.
 
• लोक आर्थिकद्ष्टया ढगडत राहतात याचं मुख्य कारण म्हणजे ते अनेक वर्ष् शाळेत गेलेले असतात.पण पैशांबदद्यदल काहीच शिकलेले नसतात  परिणामी लोक पैशासाठी काम करायला शिकतात, पण पैशाला कामाला लावायला कधील शिकत नाही ---रॉबर्ट टी. कियोसाकी
• मंजूल प्रकाशन

रिच डॅड पुअर डॅड
(अनुभव, समीक्षा, माहिती )

        आत्तापर्यंत पाच वेळा मी हे पुस्तक खरेदी केलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक माझ्याकडून घेऊन गेले, पुन्हा पुस्तकाचं नावही काढलं नाही! असो! खरं सांगू, जवळ जवळ तीन वेळा मी हे पुस्तक वाचलंय. तरीही, लेखकाने सांगितलेलं सगळंच कळलं, असं नाही म्हणू शकत. जेवढं कळलं, ते अमलात आणायचा आणि तसं वागायचा प्रयत्न करतो. सुरुवातीला खूप दिवस हे पुस्तक कपाटात असंच पडून होतं. ऐतिहासिक कथा, कादंबऱ्या वाचनाऱ्याला कसली आलीय गुंतवणूक आणि पैशांच्या पुस्तकांची आवड! तरीही कपाटात, समोर ठेवलेलं हे पुस्तक नेहमी दिसायचं आणि कधीतरी एकदा वाचून काढावं असं वाटायचं. निमित्त झालं पैशांवरून बायकोशी भांडण. संध्याकाळचे सात वाजले होते. रागातच कपाटातलं ते पुस्तक घेतलं. गाडीला किक मारली आणि तडक मारुतीचं मंदिर गाठलं. सुरुवातीची दहा पंधरा पानं भरभर वाचून काढली. थोडंस समजलं बाकी डोक्यावरून गेलं. काहीतरी पैशांच्या बाबतीत महत्वाचं नक्कीच लेखक महाशय सांगतायत एवढं कळलं. पुन्हा पुस्तक पहिल्यापासून वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता जवळ लिहायला एखादा पेपर असावा असं खूपदा वाटलं. मग काय, महत्वाची वाक्यं पुस्तकातच अधोरेखित करायला सुरुवात केली. सलग तीन साडे तासांत पुस्तक वाचून काढलं.

मुखपृष्ठावरील एक वाक्य नेहमी लक्षात राहतं.
"पैशांबाबतच्या अशा गोष्टी ज्या श्रीमंत आपल्या मुलांना शिकवतात, गरीब व मध्यमवर्गीय शिकवत नाहीत !"

        आता आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातले. शाळा शिकून, चांगली नोकरी करावी अशी साधी सरळ आमच्या आईवडिलांची अपेक्षा. यापेक्षा वेगळं ते काय? शेतकरी कुटुंबात असल्यामुळे शेतातील फळभाज्या विकणे, शेतातली, घरातली कामं करणे एवढेच आम्हाला शिकवलं आणि आम्ही करत राहिलो. आता या पुस्तकात अशा काय गोष्टी आहेत कि, ज्या आम्हाला आमच्या आईबापाने नाही शिकवल्या! चला, यासाठी तरी निदान पुस्तक वाचलेच पाहिजे!

सुरुवातीलाच काही मोठं मोठ्या लोकांचे अभिप्राय दिलेले आहेत. त्यात एकजण म्हणाला आहे कि, 
'हे पुस्तक मी २० वर्षांपूर्वीच वाचायला पाहिजे होतं.'

           जस जसे वाचन पुढे जायला लागलं, मला प्रकर्षानं जाणवायला लागलं कि, 'यार... खरंच..! हे पुस्तक मी कॉलेजला असतानाच का नाही वाचलं? अंदाजे जवळ जवळ १० वर्षांपूर्वी. म्हणजे, नक्कीच आज मी ज्या आर्थिक संकटांमधून जात आहे. ती कधीच उद्भवली नसती. आणि शंभर टक्के माझी आर्थिक बाजू बळकट झाली असती. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली असती. सद्य परिस्थिती सुधारणं अजिबात अवघड नाही. किंबहुना ते कधीच अशक्य नसतं. एक छोटंसं उदाहरण सांगतो. वजन वाढलंय, तर काय केलं पाहिजे? उत्तर एकदम सोपं आहे. रोज सकाळी किंवा पहाटे उठून एखादं दुसरा तास चाललं पाहिजे आणि खाण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. साधं काम आहे. साधा उपाय आहे आणि खूप सोप्पं सुद्धा आहे. पण, अवघड आहे. कारण जी कामं, जे उपाय किंवा जी उत्तरं साधी आणि सोपी वाटतात, ती तितकीच अवघड असतात. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? आणि काय टाळलं पाहिजे? हे जो पर्यंत तुम्हाला समजणार नाही, तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहणार आणि तुम्ही गोलगोल फिरत राहणार. ज्याला लेखक महाशयांनी रॅट रेस म्हटले आहे. आणि नेमकं हेच 'रिच डॅड पुअर डॅड' आपल्याला शिकवते.

        अजूनपर्यंत असंच वाटायचं कि, या श्रीमंत लोकांकडेच पैशांची गंगा का वाहते? ते कसे काय आणखी श्रीमंत होतात? आम्ही लोकं एवढी काटकसर करतो. बचत करतो. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतो. च्यायला! मग, आमचा पैसा जातो कुठं? आम्ही गरीबच का राहतोय? आपण आपल्या बेसिक गरजा भागवून, एखादं घर, एखाद दुसरी गाडी, मुलांची शिक्षणं, जमलं तर थोडीफार हौसमौज करतो आणि थोडंफार शिल्लक ठेवतो. यापेक्षा जास्त काहीही करू शकत नाही. तरीही आम्ही श्रीमंत का होत नाही? खरंच, या आणि आणखी कितीतरी प्रश्नांची उत्तरं या पुस्तकाने दिली. 

         आपल्या लायेबलिटीज काय आहेत आणि ऍसेट्स काय आहेत. हे उदाहरणं देऊन नेमकं स्पष्ट केलं आहे. आपण सर्वसामान्य लोकं नेमकं हेच समजून घेण्यात मार खातो. घरात लाखोंचं फर्निचर, लाखोंची इलेक्ट्रॉनिक ग्याजेट्स, वस्तू असणं म्हणजे श्रीमंती! असं आपल्याला वाटतं. बहुत करून स्त्रियांची मानसिकता तर अशी असते कि, दुसऱ्यांच्या घरात हे आहे ना! मग माझ्याकडे तिच्यापेक्षा महाग आणि भारी वस्तू पाहिजे. अहो, पण लक्षात घ्या कि, खरंच ती वस्तु तुमच्या गरजेची आहे का? तिची किती आवश्यकता आहे? उगाच इतरांशी तुलना आणि स्पर्धा करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका! आजकाल ऑनलाईन खरेदी खूप वाढली आहे. फ्लिपकार्ट बिग बिलियनर डे, ऍमेझॉन ग्रेट इंडियन सेल, अशा प्रकारचे सेल लागले रे लागले कि, खरेदीसाठी लोकं त्यावर तुटून पडतात. भरगोस सूट, शिवाय नो कॉस्ट ईएमआय, कॅशबॅकच्या नावाखाली भरगोस खरेदी. पण खरंच त्या गोष्टी गरजेच्या असतात का हो? ईएमआयच्या सायकलमध्ये मग हफ्ते भरा आणि महिना संपला कि, उधारी उसनवारी करा. पुढच्या महिन्यात, सहा महिन्यात पुन्हा ऑनलाईन सेल आहेतच लागलेले!

एक लक्षात ठेवा! जर तुम्हाला एखादं महागडं घड्याळ घ्यायचं असेल, एखादी वस्तू घ्यायची असेल! तर, ते खरेदी करण्यासाठी मला किती पैसे जास्त कमवावे लागतील? ना कि वाचवावे? आणि ते पैसे कमवण्यासाठी मला आणखी काय काय करता येईल? याचा विचार तुम्ही करायला लागाल तेव्हा तुम्हाला पैशांचं खरं गणित काय असतं? ते कळेल. आजच्या युगात नुसतंच साक्षर असून उपयोगाचे नाही. तर अर्थ साक्षर असणं, हे अत्यंत गरजेचं झालं आहे. आणि सगळ्यांनी काळाची पावलं ओळखून अर्थसाक्षर झालंच पाहिजे. नेमकं हेच आपल्याला हे पुस्तक शिकवतं. म्हणून तुम्ही हे पुस्तक वाचलंच पाहिजे.

अनेक मोठमोठे उद्योगपती कर्जबाजारी होतात. रसातळाला जातात. कोण आत्महत्या करतं तर कोण परागंदा होतं. खूप उदाहरणं आपल्या समोर आहेत. हे असे का झाले? किंवा त्या लोकांवर अशी वेळ का आली? हेही या पुस्तकातून आपल्याला कळते.

पैशाची ताकत काय आहे?
त्याची किंमत काय आहे?
आणि त्याचं गणित काय आहे?
हे पुस्तक आपल्याला शिकवतं.

        मला वाटतं, ज्यांना ज्यांना वाचता येतं. त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावं. शाळेत, कॉलेजात शिकणाऱ्या प्रत्येकाने, नुकत्याच कमवायल्या लागलेल्याने, आपली परिस्थिती सुधारू पाहणाऱ्याने हे पुस्तक वाचलंच वाचलं पाहिजे. प्रत्येक आई बापाने हे पुस्तक वाचावं आणि आपल्या मुलांना आवर्जून वाचायला सांगितलं पाहिजे. रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यापेक्षाही पुस्तकातून घेण्यासारखं, विचार करण्यासारखं आणि आपण ते आपल्या जीवनात उपयोगात आणण्यासारखं खूप आहे. आणि हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे.

संपूर्ण पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कळतं कि, लेखकाने खूप छोट्या, साध्या आणि सरळ गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आपण नक्कीच करू शकतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात अमलात आणू शकतो. शेवटी लेखकाने एक स्पीच दिलं आहे. नकळत आपल्याशी संवाद साधला आहे आणि मार्गदर्शनही केलं आहे. ते आवर्जून वाचण्यासारखं!

खाली लेखकाने मांडलेले आणि मला कळलेले काही मुद्दे घेण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत. आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरतील यात शंकाच नाही. 

१ . कमवायला लागल्या पासूनच थोडीफार गुंतवणूक करायला शिका.
२ . अनावश्यक खर्च टाळा. गरज असेल तरच वस्तू खरेदी करा.
३ . जास्तीचे पैसे उगाच उधळपट्टी करण्यापेक्षा चांगल्या योजनेमध्ये गुंतवा.
4. खूपच गरज असेल तरच क्रेडिट कार्ड वापरा. शक्यतो वापरूच नका.
५ . शक्यतो व्यवहार रोखीनेच करा. रोख पैसे जेव्हा हातातून जातात तेव्हा कळते की खर्च होतो आहे. ऑनलाइन किंवा कार्ड स्वॅप करताना पैसे कसे गेले कळतही नाही. मग महिन्याच्या शेवटी उधारी उसनवारी करावी लागते.
६ . क्रेडिट कार्ड कंपाउंड इंटरेस्ट वर काम करते. म्हणून त्याचे धोके वेळीच ओळखून वापर टाळावा.
७ . जास्तीत जास्त परतावा मिळेल अशा गुंतवणुकीचे पर्याय शोधा.
८ . आपले असेट्स वाढवा, ना कि लायेबलिटीज.
९ . होम लोन, कार लोन, फर्निचर, या सगळ्या लायेबलिटीज आहेत ना कि असेट्स.
१०.  नवीन नोकरी लागला असाल. पैसे हातात यायला लागले, कि लगेच होम लोन घेऊन घर घ्यायच्या मागे लागू नका. दहा पंधरा वर्षे रेंट वर राहिलात तरी चालेल. रेंट भरून शिल्लक राहिलेले पैसे जर 15 वर्षे गुंतवले तर 15 वर्षांनी तुम्ही त्या पैशात स्वतःच घर ऑन कॅश घेऊ शकता, ना कि बँकेचं लोन भरून. 
११. होम लोन घेतले असेल तर महिन्याचा हप्ता कमी ठेवा, जेणे करून जास्तीचे पैसे शिल्लक राहतील. काही पैसे एसआयपी मध्यें गुंतवा तर काही पैसे लोनच्या अगेन्स्ट जसे पैसे जमतील तसे भरा. त्यामुळे काय होईल की, गुंतलेल्या पैशानं पैसा वाढेल. आणि लोन अगेन्स्ट जेवढे जास्त पैसे भराल, तेवढे प्रिन्सिपल अमाऊंट कमी होईल. लवकरात लवकर लोन निल करता येईल. व्याजही कमी द्यावे लागेल. विनाकारण बँकेला जास्तीचे व्याज जाणार नाही.

लेखकाला फक्त एवढंच सांगायचं आहे की, 
"तुम्ही तुमच्या पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा"

"Your Money should work for you to make money."

Friday, 21 January 2022

बोध- लक्षपूर्वक आणि विवेकबुद्धी जागृत ठेऊन काम केल्याने सर्व संकटावर मात करता येते.

विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.

एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता. पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,"हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस." आता अजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते.
अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला.

बोध- लक्षपूर्वक आणि विवेकबुद्धी जागृत ठेऊन काम केल्याने सर्व संकटावर मात करता येते.

समाधान

इतरांची मदत करणारा माणूस नेहमी सुखी समाधानी असतो.

Thursday, 20 January 2022

motivation

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

Wednesday, 19 January 2022

Knowledge E-Resources and Online Library Services (KEOLS) : BEST PRACTICES OF LIBRARY

Title of the Practice:
Knowledge E-Resources and Online Library Services (KEOLS)
Objectives of the Practice:
1. To offer 24/7/365 days remote access to the library e-Resources and online services for the library users from anywhere and anytime
2. To save the time of the library users by providing all e-Resources at a single online platform
3. To provide a variety of e-Resources and online services to the library users to fulfil their academic, research, administrative and routine needs
4. To reduce the expenditure on printed reading material, stationery and support to the Green Environment
5. To save the expenditure on closets/ furniture needed to keep library reading materials and save the library space
6. To promote the ICT among the library users
The Context:
Library – a Knowledge Resource Centre – is supposedly focal access point to all, be it a faculty, or student or any user for that matter. It, therefore, calls and warrants for easy quick/ instant access, services available at all times, irrespective of appointed working hours. Moreover, it should provide adequate space to accommodate ever-increasing uses, space for stacking the books and other learning resources, reprographic and computing facilities, providing computer nodes to all, and to be managed with available staff and resources. The resources – staff manage the library services, machines – computers and both hardware, space for library and accommodating readers/ users, and of course, the funds are generally limited, that the institutions find it different to cope up all.
To address these issues concerns ever been/ being faced and to secure services to all, to serve its users better, the institute has internally evolved a system by leveraging smart technology that assured, ensured and generates 24 x 7 x 365 days’ remote access to library resources and a user-friendly online services from anywhere and anytime, a system that compliments, supplements and strengths the existing offline service resulting to optimizations of library services.
The Library Website and Social Networking site and QR Code are used to access the library e-Resources and online services. The users can reach and get access to the specific information resource and service in a very short time with the help of the above interfaces.
The Practice:
To perform the above practice, the library has used open-source tools/ software that are available online and doesn’t require to pay any charges.
The salient features of this innovative practice are:
a. Developing Library Website . (https://assmmedha.edu.in/library.jsp)
b. Developing Social Networking sites of Library
c. Developing Quick Response (QR) Codes for Library Resources
d. Providing Online Services and Facilities
a. Website address : https://assmmedha.edu.in/library.jsp
The library has developed a dynamic website for its users. The library portal consists very large no of web pages with important links and other documents that are useful to fulfil the academic, research, administrative and other routine needs of the users.
If the users are at a remote place or outside of the college campus, they simply access the portal that allows 24/7/365 days remote access to the library e-resources and online services. The portal can be accessed through a desktop computer and smartphone. Most of the users access the portal through smartphones as the portal is also responsive on smartphones. The usage of the library website is increasing day by day.
b. Social Networking Sites: ASSM Library
ICT is a very much popular among library users while accessing the e-Resources and online services of the library. To make it more convenient, the library has developed a Facebook Page, Facebook Account, ASSM Library Blog. Whatsapp Group, Telegram Group. Library users can download Telegram and Whatsapp Application and get information through application on their smartphone and can access all e-resources and online services of the library at any time and from anywhere.
WhatsApp link : https://chat.whatsapp.com/GGegfjIYich4DmtMDikqJR
Telegram link : https://t.me/joinchat/VdbhHOUDRMw2Mzdl
YouTube Channel Link: https://www.youtube.com/channel/UCMQxRvISU-K2CMfiYGPwnMQ
Facebook Link : https://www.facebook.com/profile.php?id=100015607923067
C. QR Code:
Web-links of e-Resources and online services are converted into QR Codes by using QR Code generator software. These QR Codes are printed on paper and displayed at the library notice board, staff room, office and other departments. Students and teachers scan the particular QR Code through their smartphones and access the e-Resource and online services of the library. Further, the accessed e-Resource can be viewed, downloaded, printed and shared. Usually, the users use the QR Code while they present on the college campus.
https://assmmedha.edu.in/pdf/qr-code-library.pdf
C. Blog :
Weblogs or blogs has got a great potential in the present web world. It is a very effective synchronous tool for sharing and communicating the information. Libraries in the 21st century can not ignore the potential of this great tool to communicate ideas, opinions, resources and news. Blogging could be an efficient and effective alternative for information and knowledge transfer, resulting in a more productive workforce in libraries. ASSM Library has provide information on Blog may affect every aspect and services of Library phenomenon from collection development to reference services; Current awareness services, as a marketing tool of Library services, as Library Newsletter, as a communication channel among the Library staff as well as among the user community.
https://assmlibrarymedha.blogspot.com/?zx=b4befd5d29b91226
Digital Library :
Instead of providing the link of various e-book websites, it will be more helpful to give users some books, so that they can carry and read the way they wish to. Calibre is definitely a good tool to manage e-books in the library. With the features available in calibre like the inbuilt web server, metadata harvesting etc., its a promising and a must know tool for librarians. Our Library have provide e-resources in academic libraries, e-books provide an opportunity for librarians to offer the academic community what they want – direct access to full-text content.
Digital Library Link : http://192.168.1.4:8080/#library_id=Calibre_Library&panel=book_list
 Knowledge e-Resources & other documents
Syllabus of Shivaji University, Exam Question Papers, Jaywant- College Magazine
e-Books, ASSM LIBRARY TOUR, Resource Database (N-LIST, NDL & INFED (INFLIBNET), College News-e-Clippings, Swayam Online Courses, Inter Library Loan Facility, INFLIBNET, Shodh Ganga Repository, News Hunt, Subscribed Journal List,
 Library Online Services & Facilities
1. Library Website.
2. QR Code Gallery
3. Information Broadcasting through Social Media: WhatsApp, Facebook, Twitter, Telegram, YouTube and Instagram etc.
4. Online Public Access Catalogue (Web OPAC)
5. Inter-Library Loan Online Application System
6. Library Users Online Feedback
7. ILL- Online Union Catalogue of College Libraries
8. Shivaji University College Librarian's Directory.
Above all, the institutional endeavour has maintained, restored enhanced and facilitated library services.
Evidence of Success/ Impact:
The Library Website, Social Networking sites and QR Code are found useful to library users. The website Visitor Counter for the usage of library portal proves that library e-Resources and other online services are being accessed frequently by users through desktop computers and smartphones. Smartphone devices are very much popular among young generation students and teachers while accessing library resources and services. College library is now promoting and delivering most of the services through social networking and online mode with the help of the above technological platforms.
Some of the remarkable outputs from the above practices are as below:
1. Users get quick remote access (24/7/365 days) to the e-Resources and online services of the library. It also saves their time and reduces the efforts to find useful e-Resources in their own subject field
2. The expenses on purchase of printed reading material are reduced and photocopy/ print charges to the users are also abridged due to the online availability of e-Resources and ultimately it supports to maintain the green environment
3. It saved the expenditure on closets/ furniture needed to keep library reading materials
4. It also saved the internal space of the library
5. It reduced the burden on library staff at the circulation counter while delivering the library services like circulation, reference, print, photocopy and other information services
6. The concept of conventional ‘Journal Bound Volume’ is replaced with ‘e-Journal Archives’ so that library space is saved and the expenses on binding the journal volumes are avoided absolutely
7. Users are now able to find the list of books, periodicals and other reading material related to their subject at anytime and anywhere
8. The scheme of Inter-Library Loan is promoted online by granting access to the teachers for ‘Online Union Catalogue of College Libraries’ and ‘Online Inter-Library Loan Application facility’
9. Conventional feedback for the library services is replaced with the 'Users Online Feedback Form' Users are now able to submit their feedback online in college website.
10. The practice promotes and motivated the library users to acquire the new ICT skills and use the ICT tools in their routine work
11. The practice has strongly promoted the core values of NAAC such as "Contributing to National Development" and "Promoting the Use of Technology" by providing free online access to the treasure of different e-Resources related to higher education at one single user-friendly interface.
Problems Encountered & Resources Required:
The library has stored all e-Resources on Google cloud storage that offers free storage up to 15 GB space only for each e-mail account. To upload additional documents or to use more than 15 GB of free space, the purchase of additional storage space is mandatory. To overcome this problem at an extreme level and save the charges on purchasing additional storage, the library has created a separate e-mail account for a different type of e-Resources and obtained 15 GB storage for each e-Resource. Library want more storage of server.
Resources required:
 Hardware:
1. Desktop for processing/accessing the Web Portal, Social Networking Mobile App and QR Code Scanner and Reader.
2. Smartphone for processing/accessing the Website, Mobile App and QR Code
3. Printer for printing the QR Code
 Software and other Web Tools:
1. Website building platform for developing a website- e.g. Google Sites, WordPress etc.
2. Cloud Storage- Google Drive, Dropbox , Facebook Cloud, Telegram Cloude etc.
3. Mobile Application Builder- WhatsApp, Telegram, Facebook, etc.
,
Dr.Sudhir Nagarkar
Librarian,
Amdar Shashikant Shinde Mahavdiyalay Medha

Tuesday, 18 January 2022

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.