मेढा - सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मेढा महाविद्यालयात उत्साहात साजरी

मेढा - सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मेढा महाविद्यालयात उत्साहात साजरी
जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य मेजर अशोक व्ही.गिरी यांनी महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडून दाखविताना असे प्रतिपादन केले की,महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.ज्योतीरावांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली.खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते.महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे.महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड,सार्वजनिक सत्यधर्म,गुलामगिरी यासारखे अनेक ग्रंथ लिहून समतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख प्रा.शंकर गेजगे यांनी तर आभार डॉ.संजय भोसले यांनी मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली .मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.