*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे गुगल क्लासरूम या विषयावर कार्यशाळा संपन्न*
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे गुगल क्लासरूम या विषयावर कार्यशाळा संपन्न* मेढा (ता.जावळी) - जयवंत प्रतिष्ठान संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट २०२४ रोजी "डिजिटल क्लासरूम क्रांती: गुगल क्लासरूम हँड्स-ऑन" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. ए. व्ही. गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. कार्यक्रमात उपप्रचार्य प्रा डॉ प्रमोद घाटगे हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून वायसीआयएस कॉलेज , सातारा येथील डॉ. विश्वनाथ घनवट उपस्थित होते त्यांनी कार्यशाळेमध्ये विशेष मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन IQAC चे समन्वयक डॉ. सरंगपाणी आर. शिंदे आणि प्रणिशास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ ओंकार यादव यांनी केले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश शिक्षकांना गुगल क्लासरूम सारख्या अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थापन प्रणालीची माहिती देणे व त्यांचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत प्र...