Friday, 11 July 2025

सकाळ बातमी

news

नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र उद्योजक सुशांत भिलारे | https://sp-news7.blogspot.com/2025/07/blog-post_11.html?m=1

Monday, 7 July 2025

*नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र**उद्योजक श्री. सुशांत भिलारे*



*नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र*
*उद्योजक श्री. सुशांत भिलारे*
विध्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संघर्ष अटळ आहे आणि सातत्य पूर्ण प्रामाणिक प्रयत्न हाच यशस्वी जीवनाचा गुरुमंत्र आहे असे मत मा. श्री सुशांत भिलारे यांनी व्यक्त केले. ते
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात "आजच्या युवकासमोरील आव्हाने आणि विविध संधी" या विषयावर विध्यर्थ्यांच्यासाठी आयोजित व्याख्यान आणि मार्गदर्शन या कार्यक्रमात बोलत होते.
सदर कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या जीवन प्रवास विध्यार्थीच्या समोर मांडला.
जावली सारख्या ग्रामीण भागातील युवक सुद्धा कसा यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून पटवून दिले.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्ध, चिकाटी आणि आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे असे मत त्यानी व्यक्त केले.
 या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा डॉ प्रमोद घाटगे यांनी सुशांत भिलारे यांचा आदर्श युवकांनी घ्यावा असे आवाहन केले. तसेच शिक्षणामुळे भविष्यात अनेक संधी उपलब्ध होतील असे मत मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविदयालयचे प्राचार्य मेजर डॉ अशोक गिरी यांनी शिस्त, संयम, सातत्यपूर्ण प्रामाणिक संघर्ष आणि एकनिष्ठा किती महत्वाची आहे हे पटवून दिले. तसेच जावली तालुक्यातील उद्योजक यांनी तालुक्यातील विध्यार्थीना प्रेरणा देऊन त्यांचे उज्वल भविष्य यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. श्री शंकर देशमुख सर यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रकाश जवळ यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा डॉ सारंगपाणी शिंदे यांनी केले आणि आभार प्रा डॉ संजय धोंडे यांनी मानले.
 सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील  विविध अभ्यास क्रमाचे विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*सहकार क्षेत्रामधील योग्य शिक्षण, प्रशिक्षण व कौशले प्राप्त करून विविध व्यवसायसह अनेक नोकरीच्या संधीसाठी युवकांनी स्वतःला सिद्धकरावे-* *सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप*

*सहकार क्षेत्रामधील योग्य शिक्षण, प्रशिक्षण व कौशले प्राप्त करून विविध व्यवसायसह अनेक नोकरीच्या संधीसाठी युवकांनी स्वतःला सिद्धकरावे-* 
*सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप*
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे सहकार संवर्धन आणि सहकारी चळवळीत युवकांचा सहभाग या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहकार निबंधक कार्यालय,मेढा येथील सहाय्यक निबंधक श्री. सुनिल जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सहकार हा मानवी जीवनाचा मूलाधार आहे. दुर्बल घटकांचा आधार म्हणून सहकाराकडे पाहिले जाते.देशाच्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनात सहकारी संस्थांनी महत्वाचे योगदान दिले आहे. जागतिकीकरणानंतर सहकारी संस्थांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. असे असले तरीही ग्रामीण समाजातील अर्थिक दृष्टया दुर्बल घटकांचे हित जोपासण्याचे कार्य सहकारी संस्था पार पाडत आहेत. देशाचा सर्वसमावेशक विकास घडवून आणण्यासाठी सहकाराशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणुनच युवकांनी सहकारी चळवळीच्या विकासासाठी आणि सहकाराचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेऊन समाजात सहकार विषयक जागृती निर्माण करावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य,मेजर डॉ.अशोक गिरी यांनी या चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका सांगून विद्यार्थ्यानी सहकाराचे प्रशिक्षण घेऊन आपले नेतृत्व विकसित करावे आणि सामजिक परिवर्तनाबरोबरच सहकारी संस्थामधून उपलब्ध होत असलेल्या अनेक रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले. या चर्चासत्रासाठी महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, सहकार तज्ञ श्री. वैभव शिंदे, श्री. अक्षय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या चर्चासत्राचे संयोजन महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागामार्फत करण्यात आले.प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय धोंडे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सुजित कसबे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.डॉ. मृणालिनी वाईकर यांनी केले.महाविद्यालयातील शिक्षक आणि १२० विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विषेश परिश्रम घेतले.