आझादी का अमृत महोत्सव

आझादी का अमृत महोत्सव मराठी माहिती –
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात दिनांक १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यकर्माचे आयोजन करावयाचे आहे.

१२ मार्च २०२१ पासून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनास सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‘आजादी का अमृत महोत्सव’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या आयोजनाबाबत विविध मंत्रालयीन मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांच्यासमवेत बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमांचे आयोजन देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त केंद्र शासनाने सुचित केल्यानुसार १५ऑगस्ट २०२३ पर्यंत राज्यभर जनसामान्यांना सामावून घेऊन करण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांनी आजादी का अमृत महोत्सव याच्या प्रयोजनार्थ गठीत केलेल्या समितीच्या धर्तीवर राज्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी विविध क्षेत्रातील समितीला गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांसाठी खालील शासन निर्णय दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी बैठकीत घेतलेला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव महाराष्ट्र राज्य शासन निर्णय –
आजादी का अमृत महोत्सव म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांसाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या समित्या तयार करण्यासाठी दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी च्या बैठकीत शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

Reference https://mahasarkariyojana.in/swatantryacha-amrut-mohotsav-marathi-mahiti/

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली .मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.