आमदार शशिकांत शिंदे, महाविद्यालय मेढा, येथेआंतरराष्ट्रीय मातृभाषादिनसंपन्न.

आमदार शशिकांत शिंदे, महाविद्यालय मेढा, येथे
आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन
संपन्न.
----------------
मेढा
दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,येथे ग्रंथालय ज्ञान स्त्रोत केंद्र व मराठी विभाग यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय मातृभाषादिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून,ग्रंथालयातील अभ्यासिकेत,कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तक वाचन व पुस्तक परीक्षण स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेसाठी एकूण 21 स्पर्धकांनी सहभाग घेतला.सुरुवातीस त्यांनी त्यांना आवडतील त्या पुस्तकांची निवड केली.त्यामध्ये कविता संग्रह,कथासंग्रह,
लेखसंग्रह व इतर पुस्तकांचा समावेश करण्यात आला होता.
आर्धा तास वाचन व नंतर आर्धा तास परीक्षण लेखन करण्याची संधी या सर्व स्पर्धक विध्यार्थ्यांना देण्यात आली.
समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी व उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे उपस्थित होते.यावेळी सहभागी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉक्टर अशोक गिरी यांनी अनमोल मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी ते म्हणाले, " मनुष्य कितीही सर्वोच्च पदावर पोहचला तर आपल्या नात्यांना,
मातीला व मातृभाषेला कधीच विसरू शकत नाही.कारण तो जेंव्हा बोलायला सुरुवात करतो तेंव्हा आपल्या मातेने शिकवलेल्या मातृभाषेतच बोलायला सुरुवात करतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व दिले पाहिजे.जगभर आज हा दिन साजरा केला जात आहे. आणि तुम्ही सर्वांनी आपल्या मराठी भाषेतील विविध पुस्तकांचे वाचन करून,त्याचे परीक्षण केलेत.ही बाब उल्लेखनीय आहे. " असे सांगून त्यांनी 
आपण सर्वांनी आपली मातृभाषा जपली पाहिजे. तिचे संरक्षण करून, मराठी भाषेचा विकास साधला पाहिजे असे आवाहन केले व मातृभाषादिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठी विभाग प्रमुख प्रा. आनंद साठे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.शेवटी ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर*सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली .मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.