आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे ,राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेनेमराठी भाषा गौरव दिन साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे ,
राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेने
1मराठी भाषा गौरव दिन साजरा
========≠========

जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील मराठी विभाग,ग्रंथालय व ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने,
दिनांक 27 फेब्रुवारी रोजी,कवी कुसुमाग्रज जन्मदिन व मराठीभाषा गौरव
दिनानिमित्त,राज्यस्तरीय महाविद्यालयीन स्तरावरील विध्यार्थ्यांच्या ऑनलाईन स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आयोजित करून, मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.यावेळी स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.अशोक व्ही.गिरी होते.तर उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे यावेळी उपस्थित होते.
उदघाटनानंतर या दोन्ही मान्यवरांनी, स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी सर म्हणाले " भारतात साजऱ्या केल्या जाणार्‍या विविध विशेष दिवसां पैकी एक महत्त्वाचा दिवस म्हणजे प्रसिद्ध मराठी लेखक - कुसुमाग्रज यांची जयंती. दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, भारत आणि जगभरात “मराठी राजभाषा दिन” किंवा “मराठी भाषा गौरव दिन ” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेच्या जडण घडणीत या महान व्यक्तीमत्वाचा मोठा हातभार होता. आपल्या हयातीत त्यांनी विविध कविता, कथा, नाटके, कादंबरी,निबंध आणि बरेच काही साहित्य लिहिले. त्यांच्या या उत्कृष्ट लेखनाचा उचित गौरव व्हावा म्हणूनच आजचा हा दिवस आपण सर्वत्र साजरा करतो. "

असे या मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व सांगून ते पुढे म्हणाले "तसे पहिले तर आपल्या मराठी भाषेला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे.संत ज्ञानदेव महाराजांपासून संत तुकाराम महाराज यांच्या पर्यंतच्या,सर्वच संतानी आपल्या अभंग रचना मराठी भाषेतच रचल्या.तर 
छत्रपती शिवरायांनी देखील मराठीभाषेला
महत्व देवून,स्वराज्याची राजभाषा म्हणून
वापरली.महात्मा फुले,श्री.म.माटे,वि.स. खांडेकर,शांता
शेळके,पु.ल.देशपांडे,
नारायण सुर्वे, कुसुमाग्रज,वसंत बापट व इतर सहित्यिकांनी मराठी भाषेत समृद्ध साहित्य लिहिले.आपणही आपल्या या मातृभाषेचा मान,शान व अभिमान बाळगला पाहिजे."
असे सांगून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाडगे यांनीही मराठी विभाग व ग्रंथालय विभागाची स्तुती करून,स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेतली गेली.यामध्ये राज्यातील 37 स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून,22विद्यार्थी स्पर्धकांनी आपल्या विविध विषयांवरील स्वरचित कविता सादर केल्या.विद्यार्थी
स्पर्धा झाल्यानंतर,काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक प्रा.डॉ.प्रदीप शिंदे आणि पत्रकार व साहित्यिक रोहित आवळे यांनी याप्रसंगी आपापल्या कविता सादर करून सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.सदर काव्यवाचन स्पर्धेत,
*विशाल चौगुले,( कोतोली - पन्हाळा - प्रथम क्रमांक )
*अजय भोईर ( पेण - रायगड ) व कु. कोमल म्हांगडे ( सातारा) विभागून - द्वितीय क्रमांक )
*कु. दिपाली बाचल ( कराड - तृतीय क्रमांक
* कु. साक्षी तिवाटणे ( फलटण ) व कु. अनिता बर्गे ( सातारा ) उत्तेजनार्थ असे क्रमांक प्राप्त केले.बक्षीसाचे स्वरूप असे
प्रथम - 2000/- रुपये, द्वितीय - 1500/-
तृतीय - 1000/- व उत्तेजनार्थ प्रत्येकी 750/- रोख, चषक,प्रमाणपत्र असे ठेवण्यात आले होते.
सदर स्पर्धेसाठी बँक ऑफ महाराष्ट्र,मेढाचे शाखाधिकारी अविनाश सुतार तसेच समाजसेवक संजय जुनघरे,सरपंच राजू खुडे व लक्ष्मण जाधव या व्यवसायिकांनी हा कार्यक्रम पार पडण्यासाठी प्रायोजक म्हणून जबाबदारी स्वीकारली.
स्पर्धेचे समन्वयक व मराठी विभाग प्रमुख प्रा.आनंद साठे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.
प्रा.डॉ.नगरकर, प्रा.डॉ.ओमकार यादव,प्रा.पी.डी.पाटील यांनी तांत्रिक बाजू सांभाळली.या ऑनलाईन स्पर्धेत काव्यरसिक व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.शेवटी सहसमन्वयक व ग्रंथपाल प्रा.डॉ.एस.आर. नगरकर यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश