' *सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी' - प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*
' *सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी' - प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सावित्रीबाई फुले यांचा पुण्यदिन साजरी करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी असे प्रतिपादन केले की, सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या समाजाला नवीन दिशा देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांशी समरस होऊन त्या शिक्षित झाल्या. पहिली स्त्री शिक्षिका म्हणून आज त्या ओळखल्या जातात. शिक्षण घेतल्यानंतर समाज जागृत झाला पाहिजे यासाठी त्यांनी मुलींच्या शिक्षणाची सुरुवात केली. वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करला परंतु त्या आपल्या ध्येयापासून वंचित झाल्या नाहीत. त्यांनी शिक्षणाबरोबर सामाजिक जागृती करण्याचा देखील प्रयत्न केला. पुणे येथील भिडे वाड्यात सुरू केलेली पहिली मुलींची शाळा आज एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उभा आहे. हा वाडा देखील आपणाला प्रेरणा देतो. समाजातील स्त्रियांच्या प्रश्नांबाबत जागृत होऊन स्त्रियांचे संघटन करून सामाजिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विधवा स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नाभिक समाजाचा पहिला संप घडवून आणला. त्यांनी आपल्या विचारांचा वारसा जतन व्हावा यासाठी अनेक कविता, ग्रंथ यांचे लिखाण करून समाजाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते या तत्त्वांचा आदर्श त्यांनी समाजात घालून दिला. जावली तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे साहेब यांनी देखील महाविद्यालयाची स्थापना करून समाज सुशिक्षित जागृत करण्याचे स्वप्न पाहिलेले आहे. या त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन गेली वीस वर्ष महाविद्यालय त्यासाठी निश्चितच प्रयत्नशील आहे. जावली तालुक्यातील स्त्रियांना प्रेरणा देण्यासाठी महाविद्यालय निश्चितच प्रयत्नशील राहील.
Comments
Post a Comment