मेढा - सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मेढा महाविद्यालयात उत्साहात साजरी
मेढा - सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती मेढा महाविद्यालयात उत्साहात साजरी जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने सत्यशोधक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य मेजर अशोक व्ही.गिरी यांनी महात्मा फुले यांचा जीवनपट उलगडून दाखविताना असे प्रतिपादन केले की,महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.ज्योतीरावांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली.खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते.महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून फु...