" *महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विध्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे असते*"*प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*==========================मेढा :

" *महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विध्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे व अनन्यसाधारण अशा स्वरूपाचे असते*"
*प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*
==========================
मेढा :22/9/2023
" महाविद्यालयाच्या जडण घडणीत माजी विद्यार्थी मंडळाची भूमिका अत्यंत महत्वाची असून,माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण या विध्यार्थ्यांचे योगदान हे महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अंत्यत महत्वाचे असते " असे प्रतिपादन प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही.गिरी यांनी केले.आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या माजी विध्यार्थी मंडळाच्या वतीने, महाविद्यालयात विध्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.त्या प्रसंगी प्राचार्य डॉ.अशोक गिरी आपल्या अध्यक्षीय भाषणावेळी बोलत होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपप्रचार्य डॉ.प्रमोद घाटगे,नॅक समितीचे समन्वयक प्रा.अमेय देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ.गिरी सर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, " महाविद्यालयातून विशेष प्राविण्य प्राप्त करून आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या,तसेच उच्च पदावर कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यानी, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करावे आणि आपल्या महाविद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा "असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सदर मेळाव्यास संबोधित करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाविद्यालयात  राबविले जात असलेले विविध उपक्रम आणि उपलब्ध भौतिक सुविधा याबाबात माहिती दिली. नजिकच्या काळात महाविद्यालयाचे नॅक समिती  कडून मूल्यांकन होणार असल्याने   माजी विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध रुपात आपले विशेष योगदान द्यावे असे यावेळी आवाहन केले.
माजी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा व त्यांच्याकडील विविध कौशल्यांचा  फायदा भावी पिढीतील विध्यार्थ्यांना व्हावा, तसेच महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण विकासामध्ये माजी विद्यार्थ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान मिळावे या उद्देशाने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यामध्ये नॅक समितीचे समन्वयक प्रा.अमेय देसाई यांनी नॅक मूल्यांकनला माजी विध्यार्थी मंडळ सदस्यांनी कसे सामोरे जावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष ॲड. श्री.अनुप लकडे, उपाध्यक्ष श्री. सुर्यकांत पवार, सलीम डांगे, शुभम लोखंडे,प्रशांत लिंगडे या विद्यार्थ्यानी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉ. संजय धोंडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. आनंद साठे यांनी सूत्रसंचालन केले.  मेळाव्यास ५० हून अधिक माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.मेळावा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी प्रा.शंकर गेजगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.