प्रा. डॉ. प्रमोद घाटगे जावली गौरव पुरस्काराने सन्मानित जावली तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये असणारी संस्था मित्रमेळा फाउंडेशन जावली यांच्यावतीने सन 2023 साठी विविध क्षेत्रात भरीव योगदान देऊन सर्वोत्कृष्ट उल्लेखनीय काम करणारे हुमगाव तालुका जावली गावचे सुपुत्र डॉ. प्रमोद रघुनाथराव घाटगे यांना त्यांच्या 31 वर्षाच्या शिक्षण सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जावली शिक्षण गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले जावली तालुक्यात जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय उभे करून डॉ. प्रमोद घाडगे सरांनी जावलीतील उच्च शिक्षणाचा खूप मोठा शैक्षणिक प्रश्न सोडवला बारावीचे एच एस सी बोर्ड परीक्षा केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची वाटचाल प्राचार्य प्रमोद घाटगे यांच्या नेतृत्वाखाली उत्तमरीत्या सुरू असून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक व शैक्षणिक स्वरूपाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधांची उपलब्धता या महाविद्यालयाने केली आहे या महाविद्यालयात आज तालुक्यातील सुमारे 40 गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत डॉ. प्रमोद घाटगे सरांनी यावेळी माझ्या कार्याची दखल घेऊन आपण दिलेला पुरस्कार माझ्यासाठी लाखमोलाचा असून मी सदैव ऋणी राहील आणि मित्रमेळा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यास सहकार्य करीत राहील हा सन्मान माझा नसून माझे कुटुंबीय, माझे गुरुवर्य, जयवंत प्रतिष्ठान संस्था आणि हुमगाव गावचा गौरव आहे असे प्रतिपादन केले यावेळी माननीय आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, सिने अभिनेता विजय निकम, चंद्रकांत कांबी रे, विशाल बांदल, महिगावकर, एकनाथ ओंबळे आदींनी कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या मित्रमेळा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण पवार सचिव निलेश धनवडे यांनी स्वागत केले अनुप लकडे यांनी प्रास्ताविक केले अमित लकेरी यांनी आभार मानले

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.