Skip to main content

Posts

Showing posts from March, 2024

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मेढा येथील आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील कु.वैभवी सुर्वे हीचे यश

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मेढा येथील आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील कु.वैभवी सुर्वे हीचे यश —---------------------- मेढा: दिनांक ९ मार्च २०२४ सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने सातारा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत,येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशीकांत शिंदे महाविद्यालयातील बी. एस्सी. भाग १ ची विद्यार्थिनी कु. वैभवी भरत सुर्वे हिने विभागून तृतीय क्रमांक मिळवला. तिने ‘जल हेच जीवन’ या विषयावर तिचे मत अतिशय उत्कृष्ट मांडणी केली.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सातारा अंतर्गत विविध जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धा ही निबंध, चित्रकला, वक्तृत्व आणि लघुपट निर्मिती अश्या प्रकारांमध्ये कनिष्ठ व आणि वरिष्ठ गटांमध्ये घेण्यात आली.कु.वैभवी सुर्वे हिच्या या यशाबद्दल महाविद्यालायचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी, उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तिचे कौतुक व अभिनंदन केले. सुर्वे हिला रोख रक्कम,प्रशस्तीपत्र व शिल्ड देवून गौरविण्यात आले.महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.आ