Skip to main content

Posts

Showing posts from April, 2024
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न* मेढा : 22 फेब्रुवारी 2024 " विध्यार्थांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्याचा विचार करावा. ध्येय निश्चित असेल तर व्यवसायात देखील नक्कीच यश मिळू शकेल. व्यवसाय करताना सर्वे करा. मार्केटची मागणी विचारात घ्या. दुसरा करतोय म्हणून आपण तोच व्यवसाय न करता त्यामध्ये काही तरी नवीन्य आणा. नोकरीच्या मागे न लागता इतरांना काम आणि नोकरी तुम्ही द्या असा व्यवसाय करा. स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते, त्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असावी लागते त्याशिवाय यश संपादन करता येत नाही " असे मत प्रसिद्ध उद्योजक सन्मानीय वसंत फडतरे यांनी व्यक्त केले. जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उद्योजक मा. श्री वसंत फडतरे हे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त दादासाहेब शिंदे होते त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्था