*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न*
मेढा : 22 फेब्रुवारी 2024
" विध्यार्थांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करण्याचा विचार करावा. ध्येय निश्चित असेल तर व्यवसायात देखील नक्कीच यश मिळू शकेल.
व्यवसाय करताना सर्वे करा. मार्केटची मागणी विचारात घ्या. दुसरा करतोय म्हणून आपण तोच व्यवसाय न करता त्यामध्ये काही तरी नवीन्य आणा.
नोकरीच्या मागे न लागता इतरांना काम आणि नोकरी तुम्ही द्या असा व्यवसाय करा. स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते, त्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी असावी लागते त्याशिवाय यश संपादन करता येत नाही " असे मत प्रसिद्ध उद्योजक सन्मानीय वसंत फडतरे यांनी व्यक्त केले.
जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उद्योजक मा. श्री वसंत फडतरे हे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त दादासाहेब शिंदे होते त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थाना विविध उपक्रम शील गोष्टी सांगून क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले
तसेच प्रास्तविक करताना
प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी यांनी शैक्षणिक वर्षात केलेल्या विविध कामगिरीचाआढावा मांडला तसेच त्यावेळी त्यांनी महाविद्यालयाची वाटचाल व विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या
प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या भाषणानंतर महाविद्यालयातील
शैक्षणिक वर्ष 2023-2024 यावर्षी क्रीडा , सांस्कृतिक , राष्ट्रीय सेवा योजना व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विध्यार्थी-विध्यार्थीनीचा गौरव करण्यात आला. तसेच
क्रीडा विभागातील शिवाजी विद्यापीठ संघात निवड झालेल्या व ऑलइंडिया इंटरइनव्हर्सिटी स्पर्धेत व खेलो इंडिया स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रमुख पाहुण्याच्या असते सन्मानचिन्ह रोख रक्कम देण्यात आली तसेच महाविद्यालयातील प्राचार्य ,उपप्राचार्य प्राध्यापक यांनी केलेल्या कामगिरी बद्धल प्रमुख पाहुण्याच्या असते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील भारतीय सैन्यदलात भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला
सत्कार करण्यात आला.
अशा प्रकारे हा वार्षिक पारितोषिक व गुणगौरव सोहळा आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिमखाना विभाग प्रमुख प्रा.प्रमोद चव्हाण यांनी अहवाल वाचन केले, प्रा. अमेय देसाई यांनी प्रमुख पाहुण्यांचा पारीचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ गायत्री जाधव ,कु .शुभांगी पाटील यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.प्रमोद घाटगे यांनी आभार मानले….
शिवजयंती २०२२
शिवजयंती शिवचरित्रातून काय शिकावे सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ दहा मावळे होते. स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुगल, निजाम, आदिलशहा असे मोठमोठे विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंच. संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वतः नेतृत्व करा. अफजलखानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते. शांत राहून प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने अमंलात आणला होता. माघार घेणे हे सुद्धा काहीवेळा आवश्यक असते. महाराज कित्येक वेळा परिस्थिती पाहून माघार घेत त्यामुळे होणारे नुकसान टळत असे आणि नव्याने तयारी करण्याची संधीही मिळत असे. सहकारी चांगले निवडा. महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची खरी ताकद होती. जय भवानी !जय शिवाजी !! शिवराय मनामनात!! शिवजयंती घराघरात!! From Dr. Sudhir Nagarkar
Comments
Post a Comment