आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय “बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन" ने सन्मानित*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय “बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन" ने सन्मानित*
==================================
मेढा 
२७ सप्टेंबर २०२४
येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास "*बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन"* दि एज्युकेशन  ओव्हरव्व्हिवज" या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील नामवंत संस्थेने 
“ नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड्स २०२४, बेस्ट कॉलेज विथ इनोव्हेटिव्ह अवॉर्ड म्हणजे “ नावीन्यपूर्ण उपक्रमशील महाविद्यालय पुरस्कार नुकताच प्राप्त  झाला आहे. अशी माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी दिली.
२००२साली जावली तालुक्याचे तत्कालीन आमदार मा.शशिकांत शिंदे साहेब यांच्या अथक परिश्रमातून या महाविद्यालयाची स्थापना झाली.दुर्गम आणि डोंगराळ भागातील विध्यार्थ्यांची विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सोय झाली.अवघ्या शंभर विद्यार्थ्यांवर सुरु झालेल्या कायम विनाअनुदानित तत्वावर सुरु झालेल्या व तालुक्यातील एकमेव महाविद्यालय म्हणून अनुदान प्राप्त झालेल्या या महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून या महाविद्याल्याने भरारी घेतली.सुरुवातीस कला व वाणिज्य या दोनच शाखा असलेल्या महाविद्यालयात विज्ञान विभाग सुरु केला.या तिन्ही विभागा बरोबरच सुसज्ज ग्रंथालय,संगणक व विज्ञान कार्यशाळा,जिमखाना विभाग, एन एस. एस. विभाग व सांस्कृतिक विभागा मार्फत महाविद्यालयात राबवले जाणारे विध्यार्थी केंद्रित उपक्रम या जोरावर या महाविद्यालयास नुकतेच आय एस ओ9001:2015 नामांकन प्राप्त झाले आहे.२०१२ साली या महाविद्यालयाला नॅक समितीने सी ग्रेड दिली, त्यानंतर २०१७ साली बी प्लस ही ग्रेड प्राप्त झाली, तर २०२३ मध्ये “ ए “ग्रेड प्राप्त झाली आहे .अशा या महाविद्यालयात आज कनिष्ठ व वरिष्ठ विभागात दोन हजार विध्यार्थी शिक्षण घेत आहेत.मागील २० वर्षात हजारो विध्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले तर अनेक विध्यार्थी सरकारी, निमसरकारी व खाजगी नोकऱ्या करीत असून अनेकांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु केले आहेत.म्हणूनच या महाविद्यालयास “नावीन्यपूर्व उपक्रमशील महाविद्यालय पुरस्कार” प्राप्त झाला.या पुरस्काराबद्दल जयवंत प्रतिष्ठान हुमगाव या  संस्थेचे *सन्माननीय अध्यक्ष ,आमदार शशिकांतजी शिंदे साहेब* व *संस्थेच्या सन्माननीय सचिव सौ वैशाली शशिकांतजी शिंदे* यांनी,महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी, उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी यांचे या यशाबद्दल  मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच आपल्या या महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख व यशस्वी कमान अशीच चढती ठेवा  अशी अपेक्षा व्यक्त करून भविष्यातील आणखीन उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.