Sunday, 19 October 2025

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न **

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न ** आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे संस्थेचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील जिमखाना विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे तसेच महाविद्यालयीन युवतींमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण व्हावी या प्रमुख उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी सांगीतले. क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय सातारा येथील ब्लड बँक आणि ग्रामीण रुग्णालय मेढा येथील रेड रिबन क्लब यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदानाचे आपले पवित्र कर्तव्य बजावले. तसेच याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनींनी आपली हिमोग्लोबिन तपासणी करून घेतली.या समाजसेवी उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशाली शिंदे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी आणि महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. प्रमोद घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभागाचे डॉ. प्रमोद चव्हाण, एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय धोंडे, डॉ.विनोद पवार तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व सदस्य, स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Friday, 17 October 2025

*वैविध्यपूर्ण वाचनातून स्वतःचा विकास झाल्यास समाज आणि देशाचा विकास निश्चितच होतो.*:*प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी*

*वैविध्यपूर्ण वाचनातून स्वतःचा विकास झाल्यास समाज आणि देशाचा विकास निश्चितच होतो.*
:*प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी*
मेढा, ता. जावळी, जि. सातारा – जयवंत प्रतिष्ठान, हुमगाव यांच्या संचालनाखाली आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात ग्रंथालय व ज्ञान स्त्रोत केंद्र, NSS विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन २०२५ यशस्वीरित्या संपन्न झाला.
दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते 12 वाजता आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले.
प्रास्ताविकात ग्रंथपाल डॉ. सुधीर रामदास नगरकर यांनी सांगितले की वाचन ही केवळ सवय नसून संस्कार आहे; नियमित वाचन व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधते.
या कार्यशाळेत सौ. गायत्री जाधव यांनी “भारतीय संविधान : उद्देशिका, अधिकार व कर्तव्य” या विषयावर वर्णनात्मक प्रकट वाचन सादर केले. त्यांनी संविधानाच्या मूलभूत तत्त्वांची माहिती सोप्या आणि स्पष्ट भाषेत विद्यार्थ्यांसमोर मांडली. उपस्थित विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि वाचनातून प्रेरणा मिळवली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, संविधानाचे महत्त्व आणि नागरिक म्हणून भूमिकेबाबत स्पष्ट समज विकसित झाला.
मुख्य पाहुणे डॉ. प्रमोद घाटगे यांनी वाचनाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास, विचारशक्ती आणि मूल्यनिष्ठ शिक्षण यांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना “वाचाल तर वाचाल” असे सांगितले व डिजिटल युगात सोशल मीडियाच्या जलद माहितीत अडकून न पडता संदर्भग्रंथ व चिंतनशील साहित्य वाचण्याचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी सांगितले की, “आपण सर्वजण दैनंदिन जीवनात वाचन करतो, पण काय वाचावे आणि काय वाचू नये हे ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे वाचन करण्याचे आवाहन केले आणि पुढे सांगितले की, “स्वतःचा विकास झाला तरच समाज आणि देशाचा विकास होतो.”
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एस. व्ही. धोंडे (NSS विभागप्रमुख) यांनी केले. त्यांनी सर्व मान्यवरांचे, आयोजक विभागांचे आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद साठे यांनी केले. त्यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक्रमाचे सर्व टप्पे उत्तम रीतीने पुढे नेले.
कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ग्रंथालय परिचारक श्री. वसंत धनावडे, श्री. आबासाहेब देशमुख, श्री. अविनाश मदने यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढली, विचारशक्ती मजबूत झाली आणि संविधानिक शिक्षणाची जाणीव निर्माण झाली, असे आयोजकांनी सांगितले.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचा पुढाकर*

*पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचा पुढाकर* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून सोलापूर आणि मराठवाडा जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने केलेल्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य,कपडे, किराणा वस्तू, खाद्यपदार्थ, शालेय साहित्य, इत्यादी  वस्तू स्वरूपातील मदत महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही .गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली संकलित करण्यात आली. याबरोबरच सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांनी जमा केलेली मदत संकलित करण्याचे प्रमुख केंद्र म्हणूनही पुढाकर घेऊन महाविद्यालयाने यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. सदर जमा केलेली वस्तू रुपातील मदत सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्षामध्ये जमा करण्यात आलेली आहे. महाविद्यालयाने जोपासलेल्या  या सामाजिक बांधिलकीबद्दल  संस्थेचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे ,सचिव वैशाली शिंदे यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे कौतुक करून  विषेश आभार मानले. प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी आणि महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ. प्रमोद घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. संजय धोंडे, डॉ.विनोद पवार, तसेच सर्व एन.एस.एस. समिती सदस्य, स्वयंसेवक विद्यार्थी यांनी  मदत संकलित करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Tuesday, 7 October 2025

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयांमध्ये ॲन्टी रॅगिंग व लैगिंक छळ प्रतिबंध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयांमध्ये ॲन्टी रॅगिंग व लैगिंक छळ प्रतिबंध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन*

मेढा दि . ७ ता जावली  येथील आमदार शशिकांत शिंदे  महाविद्यालया मध्ये आज महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत जनजागृती व विद्यार्थी सुरक्षितता या अनुषंगाने ॲॅन्टी रॅगिंग व  लैंगिक छळ प्रतिबंध संदर्भातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी रॅगिंग म्हणजे काय, रॅगिंग गैरप्रकार कसे केले जातात,अशा प्रकाराला कोणीही बळी पडू नये कायद्यामधे यासाठी कोणकोणत्या शिक्षेची तरतूद आहे या विषयी मार्गदर्शन करून पोलीस सदैव आपल्या सोबत आहेत असा विश्वास मेढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुधीर पाटील यांनी दिला.
 आजच्या सोशल मीडियाच्या जगातील वाढती नवनवीन आव्हाने व वाढती गुन्हेगारीला विद्यार्थी कसे बळी पडतात या विषयी ही श्री.सुधीर पाटील यांनी  विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून सुसंवाद साधला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक लैंगिक छळ प्रतिबंधक समितीचे समन्वयक प्रा.श्री प्रवीण जाधव यांनी केले .यावेळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा व विद्यार्थी सुरक्षितता याविषयी माहिती दिली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मेजर डॉ अशोक व्हि गिरी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सर्व विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची सुरक्षितता व काळजी कशी घ्यावी याबाबतीत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी सुरक्षितता या दृष्टीने महाविद्यालयात असलेल्या विविध सुविधा तक्रारपेटी, सीसीटीव्ही कॅमेरे व कार्यरत असणारी अँटी रॅगिंग,लैंगिक छळ प्रतिबंधक समिती, विद्यार्थी सुरक्षितता समिती तसेच या शिवाय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या  कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी  प्राचार्य म्हणून मी व माझे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वेळी महाविद्यालयात उपलब्ध असतो.जयवंत प्रतिष्ठान चे सन्माननीय अध्यक्ष मा आमदार शशिकांत शिंदे साहेब व संस्थेच्या सन्माननीय सचिव मा वैशाली शिंदे मॅडम यांचे आपणास मोलाचे सहकार्य नेहमीच लाभत असते याचा 
आवर्जून उल्लेख केला.आपल्या महाविद्यालया मध्ये आपण सर्वजण अतिशय सुरक्षित आहात असा मी आपणास विश्वास देतो. याप्रसंगी अँटी रँगिंग संदर्भातील भित्तीपत्रक व पोस्टरच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
 या कार्यक्रमासाठी महाविद्यालय विकास  समितीचे  सदस्य डॉ प्रमोद घाटगे सर यांनी शुभेच्छा दिल्या.लैंगिक छळ प्रतिबंधक समितीचे प्रा प्रविण जाधव, प्रा सौ . धनश्री देशमुख मॅडम व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्य समन्वयक प्रा संतोष कदम व सहाय्यक समन्वयक प्रा सौ सुषमा काळे मॅडम सर्व वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा.सौ गायत्री जाधव मॅडम यांनी केले तर आभार प्रा. धनश्री देशमुख मॅडम यांनी मानले.

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न **

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रक्तदान व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न ** आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढ...