Skip to main content

Posts

news of unity day

*राष्ट्रपुरुष ही देशाची संपत्ती- प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*

*राष्ट्रपुरुष ही देशाची संपत्ती- प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*   आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा येथे राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम देशाचे  माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती या निमित्ताने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये  राज्यशास्त्र विभाग प्रमुख सौ.गायत्री जाधव यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथ वाचन करून  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे प्रतिपादन केले की, ‘देशाच्या विकासात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांनी एकसंघ भारत बनविण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.देशाच्या एकसंध उभारणीत  कणखर  राज्यकर्ता गरजेचा असतो याचे उदाहरण त्यांनी आपल्या कार्यातून दाखून दिले.  बारडोली सत्याग्रहाचे प्रणेते, ५०० पेक्षा अधिक संस्थानांचे विलीनीकरण करून नवा भारत निर्माण करणारे सच्चे देशभक्त म्हणून त्यांची  वेगळी प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्या कार्याची महती कायम रहावी म्हणून गुजरात राज्यात त्यांची जगातील सर्वात उंच प

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रान भाज्या रेसिपीज चे प्रदर्शन संपन्न-

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रान भाज्या  रेसिपीज चे प्रदर्शन संपन्न- आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या वाढत आहेत. याचा फायदा  घेऊन विदेशी कंपन्या आपली निरनिराळी उत्पादने बाजारात विकत आहेत आणि युवा पिढी याचा अंधाधुंदपणे वापर करत आहेत. वेगवेगळ्या आकर्षक जंक आणि फास्ट-फूड मुळे भविष्यात आरोग्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या नव्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निसर्गाशी नाते जोडून जंक फूड ला बगल देऊन आपला परंपरागत वारसा जपण्याचा प्रयत्न आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालया मधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे रेसिपीज चे प्रदर्शन आयोजित करून केला.  मेढा हा भाग डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेला व निसर्गाशी नाळ जोडलेला असल्याने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा डोंगराळ भागातील असल्याने या उपक्रमासाठी जवळपास १२ प्रकारच्या रान भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल येथे दिसून आली. यात शेवगा, कुर्डू, केना, कर

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामार्फत प्लास्टिक निर्मूलन मोहीम*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामार्फत प्लास्टिक निर्मूलन मोहीम*    आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छ भारत अभियान २.० या उपक्रमांतर्गत मेढा बस स्थानक परिसरात प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले. या कार्यक्रमात 25 स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी सक्रीय सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संजय भोसले यांनी याकरिता पुढाकार घेतला.बस स्थानक परिसरात गोळा केलेला २० किलो प्लास्टिक कचरा नगरपंचायत मेढा यांच्याकडे सुफुर्द करण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे याचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे रक्तदान आणि एच.आय. व्ही. तपासणी शिबिर संपन्न*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा  येथे रक्तदान  आणि एच.आय. व्ही. तपासणी शिबिर संपन्न* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा  येथे दि.१९ ऑक्टोबर २०२२ रोजी जयवंत प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक मा. आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब ग्रामीण रुग्णालय मेढा व जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबिर व एच.आय. व्ही तपासणी शिबिर संपन्न झाले.  रक्तदान शिबिरात 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर एच.आय.व्ही. तपासणी शिबिरात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची एच.आय.व्ही. तपासणी करण्यात आली. या शिबिरात महाविद्यालयात उपस्थित 150 विद्यार्थ्यांची एच.आय.व्ही. तपासणी करण्यात आली.  महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी  महाविद्यालयाचे प्राचार्य  मेजर डॉ. अशोक गिरी  यांनी रक्तदात्यांचे विशेष अभिनंदन करुन  रक्तदान हेच खरे श्रेष्ठ दान असल्याने  सध्याच्या युगात जास्तीत जास्त युवा वर्गाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्त

Assm LIBRARY & KRC मध्ये नवीन आलेली पुस्तके