Wednesday, 19 October 2022
आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे रक्तदान आणि एच.आय. व्ही. तपासणी शिबिर संपन्न*
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे रक्तदान आणि एच.आय. व्ही. तपासणी शिबिर संपन्न* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा येथे दि.१९ ऑक्टोबर २०२२ रोजी जयवंत प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक मा. आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब ग्रामीण रुग्णालय मेढा व जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व एच.आय. व्ही तपासणी शिबिर संपन्न झाले. रक्तदान शिबिरात 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर एच.आय.व्ही. तपासणी शिबिरात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची एच.आय.व्ही. तपासणी करण्यात आली. या शिबिरात महाविद्यालयात उपस्थित 150 विद्यार्थ्यांची एच.आय.व्ही. तपासणी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी रक्तदात्यांचे विशेष अभिनंदन करुन रक्तदान हेच खरे श्रेष्ठ दान असल्याने सध्याच्या युगात जास्तीत जास्त युवा वर्गाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. या रक्तदान शिबिराकरिता बालाजी ब्लड बँक, सातारा या संस्थेचे समन्वयक अमोल जाधव व त्यांच्या सर्व टीमचे सहकार्य लाभले. एच. आय. व्ही. तपासणी शिबिरा करता ग्रामीण रुग्णालय मेढा येथील सुहासी महामुनी, अरुण दळवी, ज्ञानेश्वर दळवटे व त्यांची सर्व टीम यांचे सहकार्य लाभले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संजय भोसले, प्रा. डॉ. उदय पवार महाविद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
*शिक्षणातून आर्थिक उन्नती साधणे हा प्रत्येकाचा अधिकार - प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी* आ .शशिंकात शिंदे कनिष्ठ महाविद्यालय मेढा अंतर्गत ...
-
*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर* सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्...
-
शिवजयंती शिवचरित्रातून काय शिकावे सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ द...
No comments:
Post a Comment