मेढा/दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे नवनियुक्त प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला याप्रसंगी प्रास्ताविक स्टाफ प्रतिनिधी डॉ. संजय धोंडे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून महाविद्यालयाची वाढ व विकास कसा झाला हे सांगितले आणि महाविद्यालयाचा स्टाफ तरुण तडफदार आहे त्याचा नक्कीच महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयोग होईल याची ग्वाही दिली. नवनियुक्त प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी माहिती तंत्रज्ञान, वेबसाईट तसेच ऑफलाईन एज्युकेशन मध्ये सुधारणा करून खूप चांगल्या प्रकारे काम करता येईल असे सांगितले. त्यांचे स्वागत करताना महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. महेश देशमुख यांनी जयवंत प्रतिष्ठान च्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य केले जाईल आणि जावळी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्यासाठी संस्थेकडून मदत केली जाईल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी.•••••••••••••••••••••••••••••••“
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. “ प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी. •••••••••...
-
🌸✨ रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा ✨🌸 बंधाची, मायेची, विश्वासाची आणि प्रेमाची ही अमूल्य गाठ – रक्षाबंधन ❤ भाऊ-बहिणीच्या नात्यातील जिव्हाळा...
-
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न* मेढा दि . ...
-
*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे शारदीय नवरात्र उत्सवा निमित्ताने विद्यार्थ्यांना साठी आनंद सोहळ्याचे आयोजन* मेढा . दि . २५ सप्टें...
No comments:
Post a Comment