*राष्ट्रपुरुष ही देशाची संपत्ती- प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी*

*राष्ट्रपुरुष ही देशाची संपत्ती- प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी* 
 आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा येथे राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम देशाचे  माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी व पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती या निमित्ताने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये  राज्यशास्त्र विभाग प्रमुख सौ.गायत्री जाधव यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथ वाचन करून  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे प्रतिपादन केले की, ‘देशाच्या विकासात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांनी एकसंघ भारत बनविण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.देशाच्या एकसंध उभारणीत  कणखर  राज्यकर्ता गरजेचा असतो याचे उदाहरण त्यांनी आपल्या कार्यातून दाखून दिले.  बारडोली सत्याग्रहाचे प्रणेते, ५०० पेक्षा अधिक संस्थानांचे विलीनीकरण करून नवा भारत निर्माण करणारे सच्चे देशभक्त म्हणून त्यांची  वेगळी प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्या कार्याची महती कायम रहावी म्हणून गुजरात राज्यात त्यांची जगातील सर्वात उंच प्रतिमा बनविण्यात आली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येते. त्याच बरोबर स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देशाच्या निर्मितीसाठी कणखर भूमिका स्वीकारून देशाला विकासाच्या मार्गावर नेऊन ठेवले. बांग्लादेश निर्मिती, ऑपरेशन ब्लू सारखे महत्वाचे निर्णय घेऊन जागतिक पातळीवर आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली.त्यांच्या कार्याबाद्द्ल त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. 
        कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक गिरी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ‘राष्ट्रपुरुष ही देशाची संपत्ती आहे ती आपण जीवापाड जपली पाहिजे.त्यांच्या कार्यातून प्रत्येक तरुणाने प्रेरणा घेऊन आपले कर्तुत्व  सिद्ध करावे म्हणजे स्वतः बरोबर देशाचा विकास होईल असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ५००मी.राष्ट्रीय एकता दौड घेण्यात आली या एकता दौड मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग घेतला. कार्यक्रमास  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.संजय भोसले यांनी केले. आभार इतिहास विभाग प्रमुख प्रा.शंकर गेजगे यांनी मानले. या कार्यक्रमास  राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.उदय पवार, प्रा.सौ.धनश्री देशमुख, डॉ.सारंगपाणी  शिंदे सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनींचे सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश