आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात स्त्री शिक्षणाची सुरुवात करून समाजाला नवीन दिशा दिली. स्त्री शिक्षणासाठी पहिल्यांदा त्यांनी आपली पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. याचा प्रत्यय त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करून दाखवून दिला. स्त्री शिक्षणामुळे आज मोठ्या प्रमाणावर स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपले वर्चस्व मिळवले आहे. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शाळा महाविद्यालयात मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणासाठी समाजाचा रोष पत्करून त्यांनी सर्व जाती धर्मातील मुलांना आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. त्यांनी अनेक ग्रंथांचे लिखाण करून समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी कृतीची जोड दिली पुणे या ठिकाणी असलेला महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा आजही आपणाला तत्कालीन गोष्टींची जाणीव करून देतो. शेती संदर्भात त्यांनी विविध प्रयोग करून शेतीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळेच त्यांना महात्मा ही पदवी मिळाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संजय भोसले तर आभार इतिहास विभाग प्रमुख श्री. शंकर गेजगे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील 35 विद्यार्थी - विद्यार्थिनी, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी आपले  मनोगत व्यक्त केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात स्त्री शिक्षणाची सुरुवात करून समाजाला नवीन दिशा दिली. स्त्री शिक्षणासाठी पहिल्यांदा त्यांनी आपली पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. याचा प्रत्यय त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात करून दाखवून दिला. स्त्री शिक्षणामुळे आज मोठ्या प्रमाणावर स्त्रियांनी विविध क्षेत्रात आपले वर्चस्व मिळवले आहे. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शाळा महाविद्यालयात मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणासाठी समाजाचा रोष पत्करून त्यांनी सर्व जाती धर्मातील मुलांना आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला केला. त्यांनी अनेक ग्रंथांचे लिखाण करून समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी कृतीची जोड दिली पुणे या ठिकाणी असलेला महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा आजही आपणाला तत्कालीन गोष्टींची जाणीव करून देतो. शेती संदर्भात त्यांनी विविध प्रयोग करून शेतीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळेच त्यांना महात्मा ही पदवी मिळाली.
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संजय भोसले तर आभार इतिहास विभाग प्रमुख श्री. शंकर गेजगे  यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील 35 विद्यार्थी - विद्यार्थिनी, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.