*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात विदेशी वनस्पतीचे दुष्परिणाम व त्यांचे निर्मूलन या विषयावर अभियान संपन्न*कॉसमॉस सारख्या वेगाने पसरणाऱ्या विदेशी वनस्पतींचा वाढता प्रादूर्भाव आणि त्यांचे भविष्यातील संभाव्य दुष्परिणाम याची माहिती करून देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील वनस्पतीशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “विदेशी वनस्पतींचे निर्मूलन” अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा, येथील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.शेखर मोहिते आणि प्रा. रविंद्र साबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. मोहिते यांनी विदेशी वनस्पतींचा जैवविविधतेवर होणारा दुष्परिणाम आणि भविष्यातील संभाव्य धोके यावर सखोल मार्गदर्शन केले. कॉसमोस सारखी वनस्पती दिसायला कितीही चांगली असली तरी तिचे वास्तव आणि दुष्परिणाम यांची जाणीव करून दिली. तसेच प्रा.साबळे यांनी अशा वनस्पतींचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे व त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन समाजामध्ये जाणीव जागृती करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे असे प्रतिपादन केले. याच बरोबर आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा आणि लाल बहा्दूर शास्त्री महाविद्यालय, सातारा यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. महविद्यालयातील १४२ विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग घेतला. यावेळी बिभवी गावच्या लगत असलेल्या परिसरात वाढत असलेल्या कॉसमॉस या वनस्पतीचे राष्ट्रीय सेवा योजेनेच्या विध्यार्थ्यांनी निर्मुलन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ. उदय पवार यांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी या नाविन्यपूर्ण अभियानाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करुन ग्रामीण भागात शैक्षणिक प्रगतीबरोबर सामाजिक परिवर्तन करण्यासाठी आपले महाविद्यालय महत्वपूर्ण योगदान देण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ. संजय भोसले यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती धनश्री देशमुख यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात विदेशी वनस्पतीचे दुष्परिणाम व त्यांचे निर्मूलन या विषयावर अभियान  संपन्न*

कॉसमॉस सारख्या वेगाने पसरणाऱ्या विदेशी वनस्पतींचा वाढता प्रादूर्भाव आणि त्यांचे भविष्यातील संभाव्य दुष्परिणाम याची माहिती करून देण्यासाठी आमदार शशिकांत  शिंदे महाविद्यालय, मेढा येथील  वनस्पतीशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “विदेशी वनस्पतींचे निर्मूलन” अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा, येथील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.शेखर मोहिते आणि प्रा. रविंद्र साबळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. मोहिते यांनी विदेशी  वनस्पतींचा जैवविविधतेवर होणारा दुष्परिणाम आणि भविष्यातील  संभाव्य धोके यावर सखोल मार्गदर्शन केले. कॉसमोस सारखी वनस्पती दिसायला कितीही चांगली असली तरी तिचे वास्तव आणि दुष्परिणाम यांची जाणीव करून दिली. तसेच प्रा.साबळे यांनी अशा वनस्पतींचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे व त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन  समाजामध्ये जाणीव जागृती करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे असे प्रतिपादन केले. याच बरोबर आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा आणि लाल बहा्दूर शास्त्री महाविद्यालय, सातारा यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला.  महविद्यालयातील १४२ विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभाग घेतला. यावेळी बिभवी गावच्या लगत असलेल्या परिसरात वाढत असलेल्या कॉसमॉस या वनस्पतीचे राष्ट्रीय सेवा योजेनेच्या  विध्यार्थ्यांनी निर्मुलन केले. या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांची ओळख डॉ. उदय पवार यांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी या नाविन्यपूर्ण अभियानाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करुन ग्रामीण भागात शैक्षणिक प्रगतीबरोबर सामाजिक परिवर्तन करण्यासाठी आपले महाविद्यालय महत्वपूर्ण योगदान देण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ. संजय भोसले यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती धनश्री देशमुख यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे  पार पडण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.