"ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली, तो जिजाऊचा शिवबा झाला, ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली, तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, तो सीतेचा राम झाला !' प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा ! जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खुप शुभेच्छा !!!!! शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या मागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणा साठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करतो. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्या स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व 8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.... कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या का