या निमित्ताने महाविद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सौ नेहा कुलकर्णी, सचिव, श्रमिक संस्था मेढा उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ प्रमोद घाटगे होते
स्त्री पुरुष समानता या बाबत विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सोबत संवाद साधत असताना प्रमुख मार्गदर्शिका मा. नेहा कुलकर्णी यांनी समाजात स्त्रीला मिळणार्या दुय्यमत्वावर नेमके बोट ठेवले. मालमत्ता अधिकार, निर्णय अधिकार,श्रमविभागणी, हिंसाचार, लैंगिकता अधिकार अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे त्यांनी कुटुंबात आणि पर्यायाने समाजात आजही असणारी स्त्री पुरुष विषमता अधोरेखित केली. उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनात याबाबत जाणीव जागृती होऊन त्यांनी स्वतःपासून बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ प्रमोद घाटगे यांनी विद्यार्थ्यांनी सजग होऊन स्त्रीपुरूष भेद न करण्याचे आवाहन केले. आपल्या वैयक्तिक आयुष्यात महिलांना सक्षमतेची जाणीव होऊन त्यांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची इच्छा आणि संधी मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वताचा आनंद हा केवळ स्वतःच्या मनात असतो तो मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या समन्वयक गायत्री जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ उदय पवार यांनी केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात आज महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन*https://star11maharashtra.com/maharashtra/612/
No comments:
Post a Comment