Monday, 1 August 2022
Sunday, 31 July 2022
Sunday, 24 July 2022
Tuesday, 21 June 2022
21 जून 2022 आतंरराष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
https://youtu.be/kvrtfebGRgI
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः🙏🙏🙏
21 जून 2022 आतंरराष्ट्रीय योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
Monday, 6 June 2022
Dr. नमिता खोत ग्रंथ गौरव प्रकाशन सोहळा 5जून २०२२
संपादकीय मनोगत
आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच सर्व स्नेही यांना मी मुख्य संपादक डॉ. सुधीर नगरकर नमस्कार करतो व सर्वाचे स्वागत करतो. आदरणीय
डॉ. नमिता खोत मॅडम दिनांक ३१ मे २०२२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असताना या प्रसंगी अनेकांच्या मना मध्ये एका चांगल्या ग्रंथाचे प्रकाशन व्हावे अशी भावना आनेक ग्रंथालय प्रोफेशनलस नि मॅडम कडे व्यक्त केली. मॅडम नि त्याच्यावर विचार
केल्या नंतर आम्हा सर्वाना हे काम तेवढे सोपे नाही, जेवढे तुम्ही समजता आहात असे सांगितले. या गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश खांडेकर आणि गौरव समितीचे सर्व सदस्य तसेच आज प्रकाशित होणार्या गौरव ग्रंथाचे सर्व संपादक व सहसंपादक मंडळ या सर्वांनी ठरविले की जरी हे अवघड असले तरी अशक्य नाही त्यामुळे गौरव ग्रंथ प्रकाशन करावयाचे ठरले आणि यासाठी विषय ठरविण्यात आला तो म्हणजे “ग्रंथपालनातील सर्वोत्तम नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ग्रंथालयीन सेवा” म्हणजेच “Innovative Best Practices and Library Services in Librarianship”
या गौरव ग्रंथाचे दोन भागात विभाजन करण्याचे ठरले. पहिला भाग ग्रंथपालनातील सर्वोत्तम नाविन्यपूर्ण उपक्रम आणि ग्रंथालयीन सेवा आणि त्याचे उपविषय दुसरा भाग हा आदरणीय डॉ.नमिता खोत मॅडम यांच्या विषयीच्या आठवणी असे ठरविण्यात आले.
जेव्हा प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला, तेव्हा आम्हा संपादक मंडळाच्या मना मध्ये, आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल का ? असे प्रश्न उठू लागले. आणि एक प्रयत्न म्हणून डॉ.नमिता खोत ग्रंथ गौरव समिती असा WhatsApp ग्रुप तयार केला. आश्चर्य म्हणजे एक दिवसाच्या आत हा फूल्ल झाल्यामुळे दुसरा ग्रुप बनविण्यात आला. या गौरव ग्रंथासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधून १०० पेक्षा जास्त लेख पाठवून डॉ. नमिता खोत गौरव ग्रंथ प्रकाशन प्रीत्यर्थ उदंड प्रतिसाद मिळाला.
या मध्ये Innovative Best Practices चे 19 लेख Innovative Library Services adopted in Pandemic चे 8 लेख , How you started career as Library Professional चे 5 लेख Library Case Studies चे 31 लेख आणि डॉ. नमिता खोत मॅडम यांचा विषयीच्या आठवणींचे 40 लेख असे एकूण 103 लेख प्रकाशित करण्यात आले. या ग्रंथाचे प्रकाशन प्रशांत पब्लिकेशन जळगाव यांनी केलेले आहे.
मॅडमच्या सेवानिवृत्ती निमित्त प्रकाशित होणाऱ्या या गौरवग्रंथास सहकार्य करणारे गौरवग्रंथ समिती सदस्य, मित्रमंडळ, हितचिंतक, विद्यार्थी, आप्तेष्ट, तसेच प्रशांत पब्लिकेशन जळगाव मुद्रक-प्रिंटर्स यांचा मी अत्यंत आभारी आहे, सदरचा ग्रंथ आपणांसारख्या रसिक वाचकांच्या हाती देताना आत्यंतिक मानसिक समाधान लाभले तेच आपणा सर्वांना लाभो हीच सदिच्छा. तसेच सदर पुस्तक हे ग्रंथालयशास्त्रामध्ये नवीन करिअर करणाऱ्यांना, ग्रंथपाल म्हणून कार्यरत असणाऱ्यांना, ग्रंथालयशास्त्रामध्ये संशोधन करणार्यांना व सर्व ग्रंथालय प्रोफेशनल्स यांना दिशादर्शक व मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडणारे आहे.
ग्रंथालय हे संचित आहे, विचार विश्वाचे…
शब्दांची रत्ने भरुनी राहिले, भांडार शारदेचे…
आदरणीय खोत मॅडम यांनी मला या ग्रंथासाठी मुख्य संपादक म्हणून काम करण्याची व संयोजकांनी मला माझे संपादकीय मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मॅडमचा व संयोजकांचा मनापासून आभारी आहे.
https://youtu.be/k1cE7CAi5Fo
Subscribe to:
Posts (Atom)
-
*शिक्षणातून आर्थिक उन्नती साधणे हा प्रत्येकाचा अधिकार - प्राचार्य मेजर डॉ . अशोक गिरी* आ .शशिंकात शिंदे कनिष्ठ महाविद्यालय मेढा अंतर्गत ...
-
शिवजयंती शिवचरित्रातून काय शिकावे सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ द...
-
*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर* सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्...