आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे नवनियुक्त प्राचार्य मेजर डॉ. व्ही. अशोक गिरी यांचे स्वागत मेढा/दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे नवनियुक्त प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला याप्रसंगी प्रास्ताविक स्टाफ प्रतिनिधी डॉ. संजय धोंडे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून महाविद्यालयाची वाढ व विकास कसा झाला हे सांगितले आणि महाविद्यालयाचा स्टाफ तरुण तडफदार आहे त्याचा नक्कीच महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयोग होईल याची ग्वाही दिली. नवनियुक्त प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी माहिती तंत्रज्ञान, वेबसाईट तसेच ऑफलाईन एज्युकेशन मध्ये सुधारणा करून खूप चांगल्या प्रकारे काम करता येईल असे सांगितले. त्यांचे स्वागत करताना महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. महेश देशमुख यांनी जयवंत प्रतिष्ठान च्या माध्यमातून संपूर्ण सहकार्य केले जाईल आणि जावळी तालुक्यातील ग्रामीण भागातील वि...