Saturday, 29 October 2022

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रान भाज्या रेसिपीज चे प्रदर्शन संपन्न-

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रान भाज्या  रेसिपीज चे प्रदर्शन संपन्न-

आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या वाढत आहेत. याचा फायदा  घेऊन विदेशी कंपन्या आपली निरनिराळी उत्पादने बाजारात विकत आहेत आणि युवा पिढी याचा अंधाधुंदपणे वापर करत आहेत. वेगवेगळ्या आकर्षक जंक आणि फास्ट-फूड मुळे भविष्यात आरोग्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या नव्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निसर्गाशी नाते जोडून जंक फूड ला बगल देऊन आपला परंपरागत वारसा जपण्याचा प्रयत्न आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालया मधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे रेसिपीज चे प्रदर्शन आयोजित करून केला. 
मेढा हा भाग डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेला व निसर्गाशी नाळ जोडलेला असल्याने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा डोंगराळ भागातील असल्याने या उपक्रमासाठी जवळपास १२ प्रकारच्या रान भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल येथे दिसून आली. यात शेवगा, कुर्डू, केना, कर्ठूली, उंबर, ढेसा, भालगा, भारंगी या सारख्या अनेक वनस्पतीनं पासून बनविलेले पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणले होते. याच बरोबर त्यांची माहिती म्हणजेच त्यांचे शास्त्रीय नावं, कुळ तसेच पदार्थ बनविण्याच्या कृतींचीही माहिती देण्यात आली.
हा कार्यक्रम अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत घेण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य मा. डॉ.  प्रमोद घाटगे यांचे विशेष मार्गदर्शन  लाभले. अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक प्रा. शंकर गेजगे तसेच विज्ञान शाखेचे सर्व प्राध्यापक उपस्थित राहून हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. उदय पवार यांनी केले. या स्तुत्य व नाविन्यपूर्ण  उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी कौतुक केले.

Thursday, 20 October 2022

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामार्फत प्लास्टिक निर्मूलन मोहीम*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयामार्फत प्लास्टिक निर्मूलन मोहीम* 
  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून स्वच्छ भारत अभियान २.० या उपक्रमांतर्गत मेढा बस स्थानक परिसरात प्लास्टिक निर्मूलन करण्यात आले. या कार्यक्रमात 25 स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी सक्रीय सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संजय भोसले यांनी याकरिता पुढाकार घेतला.बस स्थानक परिसरात गोळा केलेला २० किलो प्लास्टिक कचरा नगरपंचायत मेढा यांच्याकडे सुफुर्द करण्यात आला. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे याचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

YOUTUBE NEWS

news https://youtu.be/z5E701OLIpk

Wednesday, 19 October 2022

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे रक्तदान आणि एच.आय. व्ही. तपासणी शिबिर संपन्न*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा  येथे रक्तदान  आणि एच.आय. व्ही. तपासणी शिबिर संपन्न* आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय,मेढा  येथे दि.१९ ऑक्टोबर २०२२ रोजी जयवंत प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक मा. आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना, रेड रिबन क्लब ग्रामीण रुग्णालय मेढा व जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्तदान शिबिर व एच.आय. व्ही तपासणी शिबिर संपन्न झाले.  रक्तदान शिबिरात 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर एच.आय.व्ही. तपासणी शिबिरात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी यांची एच.आय.व्ही. तपासणी करण्यात आली. या शिबिरात महाविद्यालयात उपस्थित 150 विद्यार्थ्यांची एच.आय.व्ही. तपासणी करण्यात आली.  महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी व उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी  महाविद्यालयाचे प्राचार्य  मेजर डॉ. अशोक गिरी  यांनी रक्तदात्यांचे विशेष अभिनंदन करुन  रक्तदान हेच खरे श्रेष्ठ दान असल्याने  सध्याच्या युगात जास्तीत जास्त युवा वर्गाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले. या  रक्तदान शिबिराकरिता बालाजी ब्लड बँक, सातारा या संस्थेचे समन्वयक अमोल जाधव व त्यांच्या सर्व टीमचे सहकार्य लाभले. एच. आय. व्ही. तपासणी शिबिरा करता ग्रामीण रुग्णालय मेढा येथील सुहासी महामुनी, अरुण दळवी, ज्ञानेश्वर दळवटे व त्यांची सर्व टीम यांचे सहकार्य लाभले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिमखाना विभाग प्रमुख प्रा. प्रमोद चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संजय भोसले, प्रा. डॉ. उदय पवार महाविद्यालयातील सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Sunday, 16 October 2022

suvichar

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे वाचन प्रेरणा दिन संपन्न...*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे वाचन प्रेरणा दिन संपन्न...*
https://star11maharashtra.com/maharashtra/2170/
*बातमी सविस्तर पहा*_ ✍️✍️
ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬●ஜ
 *स्टार११महाराष्ट्र न्युज नेटवर्क* 
ஜ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬●ஜ
*💥🌀 युवराज धुमाळ 🌀💥*