Saturday, 28 June 2025

*“अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी – एक गंभीर सामाजिक प्रश्न" - मा. न्यायदंडाधिकारी डॉ.विक्रम आव्हाड”*

*“अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी – एक गंभीर सामाजिक प्रश्न" - मा. न्यायदंडाधिकारी डॉ.विक्रम आव्हाड”*

मेढा/ दिनांक 26 जुलै 2025 रोजी, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली, मा. उच्च न्यायालय, मुंबई, ना.महाराष्ट राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, आणि मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे आदेशान्वये, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी  दिन साजरा करण्यात आला.मेढा येथील दिवाणी न्यायाधीश,क.स्तर,तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ.विक्रम आव्हाड, यांच्या मार्गदर्शनाखाली  सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर  डॉ.अशोक व्ही.गिरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.तसेच मेढा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक श्रीमती अश्विनी पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.प्रमोद घाटगे, जावली तालुका बार संघाचे अध्यक्ष ॲड. श्री.आर.एस.पोफळे, ॲड.श्रीमती.पी.डी गोरे, ॲड. श्रीमती.एन.एस. पवार,ॲड.श्री अनुप लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 याप्रसंगी बोलताना मा. डॉ.विक्रम आव्हाड यांनी सांगितले की,भारतात नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्राफिक सब्सटंन्सेस ऍक्ट- १९८५(एनडीपीएस ) नुसार  नशीले पदार्थ वापरणे गुन्हा आहे. यासाठी होणारा  दंड अगर शिक्षा ही ड्रग्सचा  किती प्रमाणात वापर होतो त्यावर अवलंबून असते.युवा पिढीमध्ये  अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी करण्याचे प्रमाण वाढत आहे हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला असून युवकांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावे असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.
  अध्यक्षीय मनोगतातून बोलताना प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी म्हणाले  की अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी ही बाब समाजाच्या  आणि एकंदर राष्ट्राच्या प्रगतीला मारक ठरत आहे. दिवसेंदिवस आपली युवा पिढी अमली पदार्थ सेवनाच्या जाळ्यात अडकत असल्याचे आढळत आहे.कोणत्याही  देशाच्या प्रगतीचा प्रमुख आधारस्तंभ युवक हाच असतो.म्हणून भावी पिढीला अमली पदार्थाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि आरोग्यसंपन्न विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजजागृती करणे ही युवा पिढीची जबाबदारी आहे.
 दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी याबाबत विद्यार्थी वर्गात जाणीव जागृती करण्याच्या प्रमुख उद्देशाने  या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या मार्फत करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस.अधिकारी डॉ.संजय धोंडे यांनी केले.प्रा.प्रकाश जवळ यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा.सौ.गायत्री जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tuesday, 1 October 2024

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय “बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन" ने सन्मानित*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय “बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन" ने सन्मानित*
==================================
मेढा 
२७ सप्टेंबर २०२४
येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास "*बेस्ट कॉलेज विथ इंनोवेशन"* दि एज्युकेशन  ओव्हरव्व्हिवज" या शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील नामवंत संस्थेने 
“ नॅशनल एज्युकेशन अवॉर्ड्स २०२४, बेस्ट कॉलेज विथ इनोव्हेटिव्ह अवॉर्ड म्हणजे “ नावीन्यपूर्ण उपक्रमशील महाविद्यालय पुरस्कार नुकताच प्राप्त  झाला आहे. अशी माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी दिली.
२००२साली जावली तालुक्याचे तत्कालीन आमदार मा.शशिकांत शिंदे साहेब यांच्या अथक परिश्रमातून या महाविद्यालयाची स्थापना झाली.दुर्गम आणि डोंगराळ भागातील विध्यार्थ्यांची विशेषतः मुलींच्या शिक्षणाची सोय झाली.अवघ्या शंभर विद्यार्थ्यांवर सुरु झालेल्या कायम विनाअनुदानित तत्वावर सुरु झालेल्या व तालुक्यातील एकमेव महाविद्यालय म्हणून अनुदान प्राप्त झालेल्या या महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक परिश्रमातून या महाविद्याल्याने भरारी घेतली.सुरुवातीस कला व वाणिज्य या दोनच शाखा असलेल्या महाविद्यालयात विज्ञान विभाग सुरु केला.या तिन्ही विभागा बरोबरच सुसज्ज ग्रंथालय,संगणक व विज्ञान कार्यशाळा,जिमखाना विभाग, एन एस. एस. विभाग व सांस्कृतिक विभागा मार्फत महाविद्यालयात राबवले जाणारे विध्यार्थी केंद्रित उपक्रम या जोरावर या महाविद्यालयास नुकतेच आय एस ओ9001:2015 नामांकन प्राप्त झाले आहे.२०१२ साली या महाविद्यालयाला नॅक समितीने सी ग्रेड दिली, त्यानंतर २०१७ साली बी प्लस ही ग्रेड प्राप्त झाली, तर २०२३ मध्ये “ ए “ग्रेड प्राप्त झाली आहे .अशा या महाविद्यालयात आज कनिष्ठ व वरिष्ठ विभागात दोन हजार विध्यार्थी शिक्षण घेत आहेत.मागील २० वर्षात हजारो विध्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले तर अनेक विध्यार्थी सरकारी, निमसरकारी व खाजगी नोकऱ्या करीत असून अनेकांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु केले आहेत.म्हणूनच या महाविद्यालयास “नावीन्यपूर्व उपक्रमशील महाविद्यालय पुरस्कार” प्राप्त झाला.या पुरस्काराबद्दल जयवंत प्रतिष्ठान हुमगाव या  संस्थेचे *सन्माननीय अध्यक्ष ,आमदार शशिकांतजी शिंदे साहेब* व *संस्थेच्या सन्माननीय सचिव सौ वैशाली शशिकांतजी शिंदे* यांनी,महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी, उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी यांचे या यशाबद्दल  मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच आपल्या या महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख व यशस्वी कमान अशीच चढती ठेवा  अशी अपेक्षा व्यक्त करून भविष्यातील आणखीन उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Monday, 2 September 2024

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे गुगल क्लासरूम या विषयावर कार्यशाळा संपन्न*

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे गुगल क्लासरूम या विषयावर कार्यशाळा संपन्न* मेढा (ता.जावळी) - जयवंत प्रतिष्ठान संचलित, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट २०२४ रोजी "डिजिटल क्लासरूम क्रांती: गुगल क्लासरूम हँड्स-ऑन" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. ए. व्ही. गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. कार्यक्रमात उपप्रचार्य प्रा डॉ प्रमोद घाटगे हे प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून वायसीआयएस कॉलेज , सातारा येथील डॉ. विश्वनाथ घनवट उपस्थित होते त्यांनी कार्यशाळेमध्ये विशेष मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन IQAC चे समन्वयक डॉ. सरंगपाणी आर. शिंदे आणि प्रणिशास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ ओंकार यादव यांनी केले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश शिक्षकांना गुगल क्लासरूम सारख्या अत्याधुनिक शिक्षण व्यवस्थापन प्रणालीची माहिती देणे व त्यांचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिके देणे हा होता. कार्यशाळेच्या उद्‌घाटन सत्रात प्रमुख पाहुण्यांनी डिजिटल शिक्षण साधनांचा वापर व त्यांची गरज यावर भाष्य केले. कार्यशाळेतील तांत्रिक सत्रात डॉ. घनवट यांनी गुगल क्लासरूम चे तांत्रिक पैलू, त्याचे वैशिष्ट्ये व त्याचा प्रभावी वापर कसा करावा याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात, प्रमुख मार्गदर्शक डॉ. विश्वनाथ घनवट यांनी उपस्थितांना प्रत्यक्ष गुगल क्लासरूम तयार करणे आणि त्याच्या मूलभूत वैशिष्ट्यांची माहिती दिली. सर्व सहभागी शिक्षकांनी तांत्रिक सत्रात आपल्या लॅपटॉपसह सहभाग घेतला आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभव घेतला. कार्यशाळेतील प्रश्नोत्तर सत्रात शिक्षकांनी गुगल क्लासरूम च्या वापरातील संभाव्य अडचणी व शंका उपस्थित केल्या. डॉ. घनवट यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करताना उपयुक्त टिप्स दिल्या. प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून गुगल क्लासरूम हे एक गुणवत्ता उपक्रम म्हणून पुढील पाच वर्षांसाठी अंगिकारण्यात येणार असल्याचे घोषित केले. कार्यशाळेत ३५ प्राध्यापकांनी उत्साही सहभाग घेतला. कार्यशाळेचा समारोप प्राचार्य डॉ. गिरी यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला.कार्यक्रमाचे आभार प्रा.श्री. प्रकाश जवळ यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा सुनिल गायकवाड यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातील सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. गिरी सर, आणि उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.

Wednesday, 14 August 2024

वैविध्यपूर्ण वाचनासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाचकांनी करणे काळाची गरज : प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी

वैविध्यपूर्ण वाचनासाठी आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाचकांनी करणे काळाची गरज : प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी मेढा/दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालात डॉ.एस आर रंगनाथान यांच्या जयंती प्रीत्यर्थ वन डे वर्कशॉप ओन इम्पोर्टन्स ऑफ रीडिंग घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही गीरी यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासावी हा संदेश दिला तसेच विद्यार्थी दसेत विद्यार्थ्यांनी संदर्भ पुस्तकाचे वाचन केले पाहिजे तसेच सध्याच्या आधुनिक युगात ऑडीओ बुक्स एकले पाहिजेत तसेच माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यानी आपले ज्ञान वाढविले पाहिजे असा बहुमूल्य संदेश दिला तसेच ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मा. प्राचार्याच्या हस्ते करण्यात आले. मा. प्राचार्य यांनी आपल्या मनोगतात वाचन केले तरच आपल्या करिअर ला दिशा मिळेल “वाचाल तर वाचाल” हा संदेश दिला व ग्रंथपाल दिनाच्या शुभेछ्या दिल्या. कार्यक्रमासाठी मा.उप प्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे उपस्थित होते त्यानी आपल्या मनोगतात वाचन सवयी चे महत्त्व सांगितले आणि वाचनातील सातत्य हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली हा संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एस आर नगरकर यांनी केले त्यांनी सध्याच्या काळात डॉ. एस. आर रंगनाथन यांच्या जीवनपट सांगितला व ग्रंथपाल दिनाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले व त्यांनीच आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. ग्रंथालय परिचारक श्री वसंत धनावडे , श्री. आबासाहेब देशमुख व श्री अविनाश मदने यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यशाळेचा व ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी घेतला.