Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

Mahatma Gandhi Punyatithi in Marathi :

Mahatma Gandhi Punyatithi in Marathi 2022 : ‘राष्ट्रपिता’ महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी नथुराम गोडसेने हत्या केली होती. या महान नेत्याच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही त्यांचे स्मरण करत आहोत. भारत दरवर्षी ३० जानेवारी हा महात्मा गांधी यांची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरा करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो. महात्मा गांधी यांनी अहिंसेचा ध्वज उभारला २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे मोहनदास करमचंद गांधी म्हणून जन्मलेल्या महात्मा गांधींनी भारतात परत येण्यापूर्वी आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करण्यापूर्वी त्यांचे उच्च शिक्षण इंग्लंडमध्ये घेतले. त्यांनी भारतात ‘अहिंसेचा’ झेंडा रोवला आणि बलाढ्य इंग्रजांशी अहिंसक आंदोलने करून लढा दिला. Reference : https://marathime.com/mahatma-gandhi-punyatithi-in-marathi/

SET EXAM Result

*Set exm Result* https://setexam.unipune.ac.in/Result.aspx

२६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिवस

प्रजासत्ताक दिवस : हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘प्रजासत्ताक दिन’ हा होय. दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.   हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. भारताच्या राजधानीत या दिवशी सकाळी ध्वजारोहणा नंतर लालकिल्ल्यावरून पंतप्रधान्नांचे राष्ट्राला उद्देशून भाषण होते. या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो.या कार्यक्रमात भारताती सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा होतो. शाळांतून, स

कर्तव्य

आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका. सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

📚 चर्चित पुस्तके #𝗡𝗲𝘄𝗕𝗼𝗼𝗸𝘀

📚 चर्चित पुस्तके #𝗡𝗲𝘄𝗕𝗼𝗼𝗸𝘀 📚 --------------------------------------------- ● 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝗣𝗼𝘀𝗶𝘁𝗶𝘃𝗲:𝗡𝗲𝘄 𝗘𝘀𝘀𝗮𝘆𝘀 𝗮𝗻𝗱 𝘀𝗲𝗹𝗲𝗰𝘁𝗲𝗱 𝗖𝗼𝗹𝘂𝗺𝗻𝘀 :-चेतन भगत ● 𝗚𝗮𝗺𝗲 𝗖𝗵𝗮𝗻𝗴𝗲𝗿 :- शाहिद आफ्रिदी ● 𝗗𝗮𝗿𝗸𝗻𝗲𝘀𝘀 𝘁𝗼 𝗟𝗶𝗴𝗵𝘁 :- लामार ओडोम  ● क्रिकेट वर्ल्ड कप : द इंडियन चॅलेंज :- आशीष रे  ● दीपा करमरकर:द स्माॅल वंडर :-बिसवेश्वर नांदी ● 𝗖𝗵𝗮𝗻𝗴𝗶𝗻𝗴 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 :- डॉ. मनमोहन सिंग ● सेंचुरी टू अवर टाईम्स:- राजमोहन गांधी ● 𝗠𝗧𝗥 𝗔 𝗕𝗶𝗼𝗴𝗿𝗮𝗽𝗵𝘆 :- के. चंद्रहास वडॉ. के. लक्ष्मीनारायण ● 𝗨𝗻𝗱𝗮𝘂𝗻𝘁𝗲𝗱: 𝗦𝗮𝘃𝗶𝗻𝗴 𝘁𝗵𝗲 𝗜𝗱𝗲𝗮 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮:- पी. चिदंबरम  ● 𝗧𝗵𝗲 𝗘𝗽𝗶𝗰 𝗝𝗼𝘂𝗿𝗻𝗲𝘆 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗚𝗿𝗲𝗮𝘁 𝗗𝗮𝗿𝗮 𝗦𝗶𝗻𝗴𝗵:- विंदू दारासिंग ● 𝗜𝗻𝗱𝗶𝗮 𝗶𝗻 𝗗𝗶𝘀𝘁𝗿𝗲𝘀𝘀:-ममता बनर्जी ● 𝗦𝗶𝗺𝗽𝗹𝗶𝗰𝗶𝘁𝘆 𝗮𝗻𝗱 𝗪𝗶𝘀𝗱𝗼𝗺:-दिनेश शाहरा ● 𝗧𝗵𝗲 𝗜𝗻𝗰𝗼𝗺𝗽𝗹𝗲𝘁𝗲 𝗠𝗮𝗻 :-विजयपत सिघांनिया ● इंडिया आफ्टर मोदी: पाॅप्युलिझम अंड द राईट:- अजय गुडवर्थी ● गोपाळगंज टू रायसीना रोड:- लालूप्रसाद यादव ● 𝗡𝗼𝘁 𝗝𝘂𝘀𝘁 𝗔 𝗖𝗶𝘃𝗶

नेताजी सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस  (बंगाली: সুভাষ চন্দ্র বসু) ( जानेवारी २३ ,  इ.स. १८९७  -  ऑगस्ट १८ ,  इ.स. १९४५ ) हे  भारतीय  स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस टोपणनाव: नेताजी जन्म: २३ जानेवारी   १८९७ कटक ,  ओडिशा ,  भारत मृत्यू: १८ ऑगस्ट ,  १९४५  (वय ४८) तैहोको ,  तैवान चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा संघटना: अखिल भारतीय काँग्रेस फॉरवर्ड ब्लॉक आझाद हिंद फौज प्रमुख स्मारके: पोर्ट ब्लेर येथील स्मारक धर्म: हिंदू पत्नी: एमिली शेंकल अपत्ये: अनिता बोस फफ नेताजी असे त्यांना प्रथम १९४२ च्या सुरुवातीस  जर्मनीमध्ये  भारतीय सैनिकांनी आणि बर्लिनमधील भारताच्या विशेष ब्यूरोमधील जर्मन आणि भारतीय अधिका-यांनी म्हणायला सुरू केले. आता त्यांना संपूर्ण भारतात नेताजी म्हटले जाते. [१] [२] सुभाष बोस यांचा जन्म  ओरिसातील  एका मोठ्या  बंगाली  कुटुंबात झाला होता.  भारतीय नागरी सेवा परीक्षा  देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. परीक्षेत ते यशस्वी झाले, परंतु राष्ट्रवाद हा उच्च दर्जाचा असल्याचे कारण देत त्यांनी अंतिम परीक्षा दिली नाही.  महात्मा गांधी  आणि  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस  यांच्

रिच_डॅड_पुअर_डॅड

#रिच_डॅड_पुअर_डॅड धन , संपत्ती जोडवी कशी या काळात याचे मार्गदर्शन करणारे सर्वोत्कृष्ट पुस्तक! ओन ऑफ द बेस्ट सेलर बुक:Rich Dad Poor Dad मराठीत/हिंदी/इंग्रजीमध्ये वैयक्तिक अर्थकारण वरील सर्वकालीन नंबर १ चे पुस्तक! करोडो प्रती जगभर विकल्या गेल्या आणि विकल्या जात आहेत. हजारो लोकांचे जीवनमान बदलून टाकणारे पुस्तक! नक्की वाचावे... किमान खालील वेगवेगळ्या मंडळींची रिव्ह्यू वाचावेत! पुस्तकाचे नाव: रीच डॅड पुअर डॅड (मराठी) लेखक:रॉबर्ट टी. कियासोकी पेज:३०५ मूल्य:399/ सवलत मूल्य:३६०/ टपाल:३५/ एकूण:३९५/ संपर्क: रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी 9421605019 #व्हॉटसअप_करून_संपर्क_साधावा.  "बेस्ट  वैयक्तिक अर्थकारणावरचे सर्वाकालीन क्र.1  चे पुस्तक !" पैशांबाबतच्या अशा गोष्टी ज्या श्रीमंत आपल्या मुलांना शिकवतात, गरीब व मध्यमवर्गींय शिकवत नाहीत.  रिच डॅड पुअर डॅड-  रॉबर्ट टी. कियोसाकी या इंग्रजी लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद अभिजित थिटे यांनी केला आहे.  जागतिक कीर्तीच्या लेखकांनी प्राध्यापकांनी व व्याख्यात्यांनी वाचून दोन  ओळीत आपले अभिप्राय लिहिले आहेत त्यातील एक अभि

बोध- लक्षपूर्वक आणि विवेकबुद्धी जागृत ठेऊन काम केल्याने सर्व संकटावर मात करता येते.

विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा. एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता. पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,"हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस." आता अजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वह

motivation

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

Knowledge E-Resources and Online Library Services (KEOLS) : BEST PRACTICES OF LIBRARY

Title of the Practice: Knowledge E-Resources and Online Library Services (KEOLS) Objectives of the Practice: 1. To offer 24/7/365 days remote access to the library e-Resources and online services for the library users from anywhere and anytime 2. To save the time of the library users by providing all e-Resources at a single online platform 3. To provide a variety of e-Resources and online services to the library users to fulfil their academic, research, administrative and routine needs 4. To reduce the expenditure on printed reading material, stationery and support to the Green Environment 5. To save the expenditure on closets/ furniture needed to keep library reading materials and save the library space 6. To promote the ICT among the library users The Context: Library – a Knowledge Resource Centre – is supposedly focal access point to all, be it a faculty, or student or any user for that matter. It, therefore, calls and warrants for easy quick/ instant access, services available at a

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी.

दिशा

आग लावणाऱ्यानां कुठं माहिती असतं जर वाऱ्यानी दिशा बदलीतर तर त्यांची सुद्धा राख होणार आहे.

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राज्य क्रीडादिन साजरा

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राज्य क्रीडादिन साजरा मेढा दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी  आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय येथे ऑलम्पिक कास्य पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली पै खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य  डॉ. प्रमोद घाटगे यांनी केले प्रास्ताविक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले त्यांनी ऑलम्पिक कास्यपदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्या  विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे  डॉ. उदय पवार, डॉ. ओंकार यादव प्रा. सुनील केमदारणे, सौ. धनश्री देशमुख मॅडम तसेच सर्व शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार डॉ. सुधीर नगरकर यांनी मानले.

जशास तसे...

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. 

मकर संक्रांती : “तिल-गुळ घ्या आणि गोड गोड बोला”

पौष महिन्यात, जेव्हा सूर्य देव धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करतो. मग हिंदू धर्माचा हा सण मकर संक्रांती म्हणून साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली. म्हणूनच यास उत्तरायणी उत्सव देखील म्हटले जाते. भगवान शनिदेव मकर राशीचे स्वामी आहेत आणि या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतात, या दिवशी जप, तपश्चर्या, ध्यान आणि धार्मिक क्रिया अधिक महत्त्वाच्या आहेत. याला कापणीचा सण देखील म्हणतात.या दिवसाआधी, सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धांवर थेट किरण टाकतो. ज्यामुळे रात्र जास्त आहे आणि उत्तर गोलार्धात दिवस कमी आहे. या कारणास्तव, थंडीचा हंगाम देखील टिकतो. या दिवसापासून सूर्य पृथ्वीच्या उत्तर गोलार्धकडे जाऊ लागतो. ज्यामुळे हवामानात बदल होत असून हे शेतकऱ्याच्या पिकांसाठी फायदेशीर आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, पृथ्वी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आहे. मकरसंक्रांती साजरी करण्याचा मार्ग (Way to celebrate Makar Sankranti in Marathi) वेगवेगळ्या समजुतीनुसार या उत्सवाचे पदार्थही वेगवेगळे असतात पण डाळ आणि तांदूळची खिचडी ही या उत्सवाची प्रमुख ओळख आहे. या दिवशी गुळ व तूप सोबत

प्रयत्न

कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,  कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास, आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची  तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही, म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा, यश तुमची वाट पाहात आहे.”

शिक्षण

शिक्षण हे साध्य नसून समाधान आहे, शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवसमाज निर्माण करावयाचा आहे.

Interlibrary Loan

Interlibrary loan  (abbreviated  ILL , and sometimes called  interloan ,  interlending ,  document delivery ,  document supply , or  interlibrary services , abbreviated  ILS ) is a service whereby a patron of one  library  can borrow books, DVDs, music, etc. and/or receive photocopies of documents that are owned by another library. The user makes a request with their home library; which, acting as an intermediary, identifies libraries with the desired item, places the request, receives the item, makes it available to the user, as well as arranges for its return. The lending library usually sets a due date and overdue fees of the material borrowed. Although books and journal articles are the most frequently requested items, some libraries will lend audio recordings, video recordings, maps, sheet music, and  microforms  of all kinds. In some cases, nominal fees accompany the interlibrary loan services. The term  document delivery  may also be used for a related service, namely the supply

कोशिश करने वालों की कभी हार नही होती!!!!!

कई लोग इस रचना को  हरिवंशराय बच्चन जी  द्वारा रचित मानते हैं। लेकिन श्री अमिताभ बच्चन ने अपनी  एक फ़ेसबुक पोस्ट  में स्पष्ट किया है कि यह रचना  सोहनलाल द्विवेदी जी  की है। लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है मन का विश्वास रगों में साहस भरता है चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है जा जाकर खाली हाथ लौटकर आता है मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती असफलता एक चुनौती है, स्वीकार करो क्या कमी रह गई, देखो और सुधार करो जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती!!! Reference http://kavitakosh.org/kk/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%B

Inspirational Thought

"वाट पाहणाऱ्यांना तितकेच मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यानि शिल्लक ठेवलेले असते" - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

कोहा - ग्रंथालयांसाठी ओपन सोर्स सोफ्टवेअर

  कोहा  - ग्रंथालयांसाठी ओपन सोर्स सोफ्टवेअर   Dr.Sudhir Nagarkar   M.A.,M.Lib.& I.Sc.,M.Phil.,SET,NET,Ph.D.   Librarian, Amdar Shashikant Shinde Mahavdiyalaya Medha Satara   Cell No.9096572888 email : nagarkarsr@gmail.com   मा गील  पंचवीस  वर्षांत ग्रंथालयातील बदल झपाटय़ाने झालेले आढळत आहेत. हे बदल मुख्यत: ग्रंथालय आधुनिकीकरणाचे आहेत. ग्रंथालयाचे स्वरूप , कार्यपद्धती , सेवासुविधा , वाचन साहित्य आणि वाचकांच्या अपेक्षा यात खूप फरक पडलेला जाणवत आहे. तंत्रज्ञानाचा विशेषत: संगणकीय तंत्रज्ञानाचा प्रभाव छोटय़ा मोठय़ा साऱ्याच गोष्टींवर पडलेला दिसतो. बदललेल्या या साऱ्या कार्यपद्धतीला काळ , श्रम , पैसा आणि जागा यांचे निकष लावून तपासले तर या साऱ्या बदलांचे गांभीर्य सहज दिसून येते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक परिमाण बदलतो हे जरी खरे असले तरी काही शाश्वत मूल्ये ही नेहमीच साऱ्या बदलांना आणि तंत्रज्ञानाला दिशादर्शक ठरली आहेत हे सुद्धा तितकेच सत्य आहे.   एकविसाव्या शतकाचा पाया समजल्या जाणाऱ्या संगणकीय तंत्रज्ञानातही एक चळवळ अशीच निर्माण झाली ती म्हणजे ओपन सोर्स

सुविचार

“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.” - ग्रंथालय 

Motivational Thought

आपली खरी स्वप्न तीच आहेत, जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात. - ASSM LIBRARY

सावित्रीबाईंना त्यांच्या १९१ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

१८व्या शतकात महाराष्ट्रात स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतीराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १९१ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन ! त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते. अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य जोतीराव व सावित्रीबाई यांनी केले. १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून या दाम्पत्याने प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजि

*मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता

*मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता* *" सरणारे वर्ष मी "* मी उद्या असणार नाही  असेल कोणी दूसरे  मित्रहो सदैव राहो  चेहरे तुमचे हासरे  झाले असेल चांगले  किंवा काही वाईटही  मी माझे काम केले  नेहमीच असतो राईट मी माना अथवा नका मानु  तुमची माझी नाळ आहे  भले होओ , बुरे होओ  मी फक्त " काळ " आहे उपकारही नका मानु  आणि दोषही देऊ नका  निरोप माझा घेताना  गेट पर्यन्त ही येऊ नका  उगवत्याला " नमस्कार " हीच रीत येथली  विसरु नका ' एक वर्ष ' साथ होती आपली  धुंद असेल जग उद्या नव वर्षाच्या स्वागताला तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझा प्राक्तनाला  शिव्या ,शाप,लोभ,माया यातले नको काही  मी माझे काम केले  बाकी दूसरे काही नाही  निघताना " पुन्हा भेटु " असे मी म्हणनार नाही  " वचन " हे कसे देऊ  जे मी पाळणार नाही  मी कोण ? सांगतो  " शुभ आशीष " देऊ द्या  " सरणारे वर्ष " मी आता मला जाउ द्या। 🙏💦🌸💦🙏

सुविचार

बुद्धी ऐरण आहे आणि ज्ञान घण आहे जितके जीवनाचे अनुभव बुद्धीवर पडतात तितकी ती चमकते.   ग्रंथालय

राष्ट्रीय ग्राहक दिन २४ Dec २०२१

 जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सातारा जिल्हा ग्राहक पंचायतच्या अध्यक्षा मा. सौ. सुनीता राजेघाटगे या उपस्थित होत्या तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री रंगराव जाधव, जिल्हा माहिती प्रमुख, ग्राहक पंचायत, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद घाटगे होते.  या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. सौ. सुनीता राजेघाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. 'ग्राहक अधिकार', 'राष्ट्रीय ग्राहक दिन' या विषयांवर आधारित  अतीशय उत्तम रीतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे कौतुक प्रमुख पाहुण्यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सौ सुनीता राजे घाटगे यांनी भारतातील तसेच जागतिक ग्राह

ASSM ग्रंथालय वार्षिक अहवाल 2020 -21

 AMDAR SHASHIKANT SHINDE MAHAVIDYALAYA,MEDHA Library & Knowledge Resource Center २०२०-२१ “ग्रंथालय हे संचित आहे, विचार विश्वाचे, शब्दांची रत्ने भरुनी राहिले, भांडार शारदेचे”  सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालय हे ‘KNOWLEDGE RESOURCE CENTER’ ची भूमिका बजावत आहे. आमचा महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये एकून ग्रंथसंख्या 11554 आहे. तसेच एकून 20 नियतकालीके / जर्नल्स घेतले जात आहेत. 11 दैनिक वर्तमानपत्रे घेतली जात आहेत तसेच ई-बुक्स , नॉन बुक मटेरिअल आणि ग्रे लिटरेचर चा अंतर्भाव केला जात आहेत.  Library Orientation and Information Literacy Program 2019-20.  या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा परिचय होण्यासाठी ग्रंथालयाचा नेमका वापर कसा करावयचा या बाबत Library Orientation and Information Literacy Program 2019-20 हा B.A.I, B.Com.I व  B.Sc.I  वर्गावर मार्गदर्शन पर व्याख्यान ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी घेतले तसेच ग्रंथालयात येऊन ग्रंथालयाचा वापर कसा करावयाचा याचे विद्यार्थांना ग्रंथालयात आणून प्रत्यक्षीक दाखविण्यात आले. ग्रंथपाल  दिन 2019-20  -  ग्रंथपाल