आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे राज्य क्रीडादिन साजरा
मेढा दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय येथे ऑलम्पिक कास्य पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली पै खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी केले प्रास्ताविक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी केले त्यांनी ऑलम्पिक कास्यपदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे डॉ. उदय पवार, डॉ. ओंकार यादव प्रा. सुनील केमदारणे, सौ. धनश्री देशमुख मॅडम तसेच सर्व शिक्षकेतर वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार डॉ. सुधीर नगरकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment