ASSM ग्रंथालय वार्षिक अहवाल 2020 -21

 AMDAR SHASHIKANT SHINDE MAHAVIDYALAYA,MEDHA

Library & Knowledge Resource Center

२०२०-२१

“ग्रंथालय हे संचित आहे, विचार विश्वाचे, शब्दांची रत्ने भरुनी राहिले, भांडार शारदेचे” 

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालय हे ‘KNOWLEDGE RESOURCE CENTER’ ची भूमिका बजावत आहे. आमचा महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये एकून ग्रंथसंख्या 11554 आहे. तसेच एकून 20 नियतकालीके / जर्नल्स घेतले जात आहेत. 11 दैनिक वर्तमानपत्रे घेतली जात आहेत तसेच ई-बुक्स , नॉन बुक मटेरिअल आणि ग्रे लिटरेचर चा अंतर्भाव केला जात आहेत. 

Library Orientation and Information Literacy Program 2019-20. 

या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा परिचय होण्यासाठी ग्रंथालयाचा नेमका वापर कसा करावयचा या बाबत Library Orientation and Information Literacy Program 2019-20 हा B.A.I, B.Com.I व  B.Sc.I  वर्गावर मार्गदर्शन पर व्याख्यान ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी घेतले तसेच ग्रंथालयात येऊन ग्रंथालयाचा वापर कसा करावयाचा याचे विद्यार्थांना ग्रंथालयात आणून प्रत्यक्षीक दाखविण्यात आले.

ग्रंथपाल  दिन 2019-20  -  ग्रंथपाल दिन निमित्त प्रमुख पाहुणे महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे सर हे उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सुधीर नगरकर यांनी केले त्यात डॉ. एस.आर. रंगनाथन यांचा जन्मदिवसाचे महत्व सांगितले. प्रमुख पाहुणे यांनी वर्तमानपत्रे जर्नल्स व संदर्भ पुस्तके वाचून विद्यार्थिनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे तसेच  ग्रंथालय हा महाविद्यालयाचा आत्मा असतो ग्रंथालयाचा विकास झाल्यास विद्यार्थ्यांचा व समाजाचा विकास होतो. ग्रंथालयाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे असे उद्बोधन केले. या वेळी महाविद्यालयातील नियतकालिकांचे व जर्नल्सचे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रा.सुनील गायकवाड डॉ. सारंगपाणी शिंदे, प्रा.गेजागे डॉ.संजय भोसले आणि प्रा.प्रकाश जवळ , डॉ. संजय धोंडे , डॉ. उदय पवार तसेच प्रा.सुनील केमदारणे व ग्रंथालय सेवक वसंत धनावडे उपस्थित होते या कार्यक्रमास  सर्व  शाखेचा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी श्री.आबासाहेब देशमुख जगदीश ओंबळे व प्रशांत परिहार यांचे सहकार्य लाभले.

वाचन प्रेरणा दिन - मेढा / दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. सुधीर नगरकर यांनी  डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा शैक्षणिक जीवनाचा प्रवास सांगितला तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त सर्वांकडून वाचन वृद्धीसाठी सर्वांनी संकल्प खालील प्रमाणे म्हंटला " मी संकल्प करतो कि, मी माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी, सकारात्मक प्रेरणेसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी, नियमित वाचन करीन तसेच माझ्या परिवारातील सदस्यांना मित्रांना व विद्यार्थ्यांना देखील चांगले आयुष्य घडविण्यासाठी, वाचन करण्यास प्रवृत्त करीन, नियमित वाचूया जीवन घडवूया .

 या कार्यक्रमासाठी अध्यक्ष अध्यक्षीय मनोगतात  प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श घेऊन वाचनाची सवय प्रत्येकाने जोपासली पाहिजे तसेच वाचाल तर वाचाल हा संदेश दिला. सर्व प्राध्यापकांनी वाचन सवयी विकसित करून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करुन त्यांचे भविष्य घडवावे  असे मार्गदर्शन केले तसेच ग्रंथालय कडून सुरू केलेल्या सोशल नेटवर्किंगचा वापर करून  ई-वाचनकट्टा उपक्रमाचा सर्वांनी वापर करावा असे आवाहन केले. आभार प्रदर्शन श्री वसंत धनवडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ग्रंथालय आपल्या वर्गात उपक्रम : 

आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वाचन सवयी वाढी साठी ग्रंथालयाने B.A., B.COM. व B.SC. च्या वर्गा मध्ये जाऊन  सलग एक तास “मुकवाचन उपक्रम” राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी ग्रंथालयामार्फत अविनाश मदने आणि आबासाहेब देशमुख जगदीश ओंबळे, हिंदुराव जाधव, प्रशांत परिहार यांनी  ग्रंथप्रदर्शन आणि विविध उपक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रा. डॉ.संजय भोसले डॉ. सारंग शिंदे व इतर प्राध्यापकवाचक , विद्यार्थीवाचकांनी सहभाग घेतला

Library Services: 

महाविद्यालयाच्या ग्रंथालयातून अनेक ग्रंथालयीन सेवा वाचकांना पुरविल्या जातात.वाचकांना देवघेव सेवा , संदर्भ सेवा , रेफरल सेवा CAS , SDI सेवा तसेच प्रतिलिपी सेवा , करिअर माहिती सेवा, कात्रण सेवा आणि online Information सेवा व social Networking सेवा दिल्या जात आहेत. तसेच महाविद्यालयाच्या www. assmmedha.edu.in या वेबसाईट च्या माध्यमातून महाविद्यालयाची अद्ययावत माहिती उपयोजका पर्यंत पोहचविली जाते.

email service -assmlibrarymedha@gmail.com

Library Website : https://sites.google.com/view/assmlibrarymedha

Facebook Account Name : Assmlibrary Medha

Facebook Page :  https://www.facebook.com/Assm-Medha-Library-779541448844980/

MPSC / UPSC Study Centre ASSM Medha Face book Page : https://www.facebook.com/assmlibrarymedha/

WhatsApp LIBRARY SERVICE  - 9096572888

LIBRARY AUTOMATION:

ग्रंथालयामध्ये कोहा हे software वापरून ग्रंथालयाचे LIBRARY AUTOMATION पूर्ण करण्यात आले आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचकांचा वेळ वाचवून सेवा देण्यासाठी ग्रंथालय सुसज्ज झाले आहे. महाविद्यालयाचे ग्रंथालय हे माहितीचे निर्मिती, संकलन , संग्रहण, संप्रेषन आणि माहितीची प्रतीप्राप्ती करण्यासाठी उपयोजकाना माहितीवर प्रक्रिया करण्याची महत्वाची भूमिका बजावत आहे. ग्रंथपाल डॉ.सुधीर नगरकर व  श्री. वसंत धनावडे , श्री. अविनाश मदने हे ग्रंथालयातील सेवक सेवाभावी वृत्तीने वाचकांना सेवा देण्याचे कार्य करीत असतात.वाचकांचे समाधान हाच केंद्रबिंदू मानून ग्रंथालय कार्य करीत आहेत.

STATE LEVEL WEBINAR ON MPSC-UPSC / PSI-STI-ASO व इतरही सर्व 'स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी' या विषयांवर ऑनलाईन माध्यमाद्वारे मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान : 


अपयशाला न घाबरता सतत प्रयत्नवादी रहा यश तुमचेच आहे! आमदार आमदार शशिकांत शिंदे साहेब

'द युनिक अकॅडमी'च्या सहकार्याने, जयवंत प्रतिष्ठान, हुमगांव संचालित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा आणि आमदार शशिकांत शिंदे स्पर्धा परीक्षा केंद्र, कोरेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. ६ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता STATE LEVEL WEBINAR ON MPSC-UPSC / PSI-STI-ASO व इतरही सर्व 'स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी' या विषयांवर ऑनलाईन माध्यमाद्वारे मोफत मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. या वेबिनार साठी प्रमुख उपस्थिती : आदरणीय आमदार शशिकांत शिंदे साहेब होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपयशाला खचून न जाता सतत प्रयत्नवादी राहून अभ्यास केला तर नक्कीच यश मिळेल.जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य असेल तर सातारा जिल्ह्यातील अनेक अधिकारी यांचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हास मिळेल असे सांगितले तसेच आदरणीय सौ. वैशाली शिंदे (सचिव,जयवंत प्रतिष्ठान) यांनी कोरेगाव येथे स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका उपलब्ध करून दिलेली आहे.त्यामध्ये अनेक होतकरू गरीब विद्यार्थी अभ्यास करून नक्कीच यश मिळवतील अशा शुभेच्छा दिल्या. 

सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. तेजस दादा शिंदे यांनी स्पर्धा परीक्षेसाठी अनेक वेबिनार, व्याख्याने आयोजित करण्यासाठी सर्वोतपरी मदत करीन असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

'स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक हर्षल लवंगारे ( प्राद्यापक, 'द युनिक अकॅडमी, पुणे) हे होते. त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, त्याचे स्वरूप, स्पर्धा परीक्षेविषयी इत्थंभूत माहिती सांगितली.


प्रस्ताविक मा. प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे सर यांनी केले त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला व विद्यार्थ्यांना पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. द युनिक अकॅडमी यांच्या वतीने प्रास्ताविक चंद्रकांत खराटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख डॉ. सुधीर नगरकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ. गणेश होळ यांनी केले . या स्टेट लेवल वेबिनार चा महाराष्ट्रातून एकूण 800 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी जयवंत प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.शशिकांत शिंदे साहेब व सचिव मा.वैशाली शिंदे , मा. तेजसदादा शिंदे तसेच मा. राहुलभाई जगताप आणि विश्वस्त मा. अशोकराव नवले व मा. दादासाहेब शिंदे यांची  सतत प्रेरणा मिळत असते तसेच  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे व सर्व विषयांचे HOD व प्राध्यापक वृंद आणि शिक्षेकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सतत सहकार्य व मार्गदर्शन मिळते.


    डॉ. सुधीर रामदास नगरकर 

      ग्रंथपाल

         ज्ञान स्त्रोत केंद्र , मेढा 


Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.