*मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता

*मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता*

*" सरणारे वर्ष मी "*

मी उद्या असणार नाही 
असेल कोणी दूसरे 
मित्रहो सदैव राहो 
चेहरे तुमचे हासरे 

झाले असेल चांगले 
किंवा काही वाईटही 
मी माझे काम केले 
नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानु 
तुमची माझी नाळ आहे 
भले होओ , बुरे होओ 
मी फक्त " काळ " आहे

उपकारही नका मानु 
आणि दोषही देऊ नका 
निरोप माझा घेताना 
गेट पर्यन्त ही येऊ नका 

उगवत्याला " नमस्कार "
हीच रीत येथली 
विसरु नका ' एक वर्ष '
साथ होती आपली 

धुंद असेल जग उद्या
नव वर्षाच्या स्वागताला तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझा प्राक्तनाला 

शिव्या ,शाप,लोभ,माया
यातले नको काही 
मी माझे काम केले 
बाकी दूसरे काही नाही 

निघताना " पुन्हा भेटु "
असे मी म्हणनार नाही 
" वचन " हे कसे देऊ 
जे मी पाळणार नाही 

मी कोण ? सांगतो 
" शुभ आशीष " देऊ द्या 
" सरणारे वर्ष " मी
आता मला जाउ द्या।

🙏💦🌸💦🙏

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश