Sunday, 20 February 2022

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे नेट व सेट परीक्षेत यश

विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांचे  नेट व सेट परीक्षेत यश

मेढा /सातारा : विद्यानिकेतन सेट नेट गाईडन्स सेंटर, सातारा येथील श्री सिद्धार्थ कुलकर्णी कराड यांनी नेट आणि सेट या दोन्ही परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले तसेच श्रीमती अश्विनी शिंदे पुणे आणि रूपाली पाटील कोल्हापूर यांनीही सेट परीक्षेमध्ये यश संपादन केले. गायडन्स सेंटरचे समन्वयक प्रा. वंदना शिंदे तसेच प्रा.तेजस्विनी बाबर यांनी त्यांचे अभिनंदन केले.  त्यांना  प्रा.अतुल नगरकर व डॉ.सुधीर नगरकर  ग्रंथपाल आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या श्री सिद्धार्थ कुलकर्णी हे एम.ई.सी. बी.मध्ये कार्यरत आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सर्वांना भविष्यकाळातील कार्यासाठी विद्यानिकेतन च्या सचिव डॉ. विद्याताई शेखर पाटील यांनी  शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment