शिवजयंती २०२२
शिवजयंती
शिवचरित्रातून काय शिकावे
सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ दहा मावळे होते. स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुगल, निजाम, आदिलशहा असे मोठमोठे विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंच.
संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वतः नेतृत्व करा. अफजलखानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते. शांत राहून प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने अमंलात आणला होता.
माघार घेणे हे सुद्धा काहीवेळा आवश्यक असते. महाराज कित्येक वेळा परिस्थिती पाहून माघार घेत त्यामुळे होणारे नुकसान टळत असे आणि नव्याने तयारी करण्याची संधीही मिळत असे.
सहकारी चांगले निवडा. महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे
सहकारी हीच महाराजांची खरी ताकद होती.
जय भवानी !जय शिवाजी !!
शिवराय मनामनात!!
शिवजयंती घराघरात!!
From
Nicely written
ReplyDelete