www.esahitya.in

ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.in
www.esahity.com 
एक प्रसन्न अनुभव



प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.

करोनामुळे सगळे व्यवहार ठप्प झाले, पण ई साहित्य नाही. ई साहित्य दुप्पट नव्हे, चौपट नव्हे तर ३० पट जोमाने कामाला लागलं. खरंच. वाचकसंख्येत चक्क तीसपट वाढ झाली. ई साहित्यवर सहसा ग्रामीण आणि विदेशातले वाचक जास्त असत, पण मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर असे वाचक फ़ार कमी असत. या काळात शहरी वाचकांचा पायरव ई साहित्यवर वाढला. पुस्तकांचे डाऊनलोड तर तीसपटींनी वाढलेच, पण लेखकांच्या संख्येतही वाढ झाली. २०१९ मध्ये संपूर्ण वर्षात १५७ पुस्तके प्रकाशित झाली होती. आता या साडेसात महिन्यांत तेवढी झाली. पुस्तकांच्या दर्जातही लक्षणीय वाढ झालेली तुम्हाला जाणवेल. ई साहित्यच्या नवीन वेबसाइटवर, www.esahity.in वर वाचकांचा ओघ प्रचंड वाढतो आहे. तुम्हीही एकदा पहाल तर प्रथमदर्शनी प्रेमात पडाल. ई साहित्यवर आता ईपब चा नवीन सेक्शनच सुरू झाला आहे. त्यात आठवड्याला तीन पुस्तके येतात. ऑडिओ पुस्तकांचाही ओघ वाढत आहे. दर महा वीस नवीन पुस्तकं, नियतकालिकं येत आहेत. बारा वर्षं अखंडपणे हा यज्ञ चालू राहिला व गेल्या महिन्यात आपण तेराव्या वर्षात पदार्पण केले. या काळात वर्षानुवर्षे आपण दिलेल्या उत्साहवर्धक पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले.

या मेल सोबत गेल्या सात महिन्यातील पुस्तकांची यादी व लिंक्स देत आहोत. त्याचबरोबर गेल्या सात महिन्यांतील तीसेक कथाकादंबर्‍यांचं एक अनोखं पुस्तक आहे. यातील प्रत्येक कव्हरवर क्लिक करताच ते पुस्तक तुम्ही वाचू शकाल.

टेक्नॉलॉजी खूप वेगाने बदलत आहे. आणि ई साहित्य त्याच्या दुप्पट वेगाने पुढे जाऊ इच्छिते. आपली मराठी भाषा जगाच्या नकाशावर सुर्यासारखी तळपली पाहिजे. माझा मराठीचा अमृतबोल सर्वत्र घुमावा यासाठी आपण आपल्या सर्व मराठी मित्रांना ही मेल पाठवा. यातील पुस्तके whatsapp करा. मराठी माणसांना मराठी पुस्तके वाचायचं व्यसन लावूया.

सर्वजण मिळून मराठीचा घोष करूया.

जय महाराष्ट्र

 

कळावे, लोभ असावा ही विनंती

सुनीळ सामंत

टीम ई साहित्य

ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.in
www.esahity.com
एक प्रसन्न अनुभव

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती २०२२

भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भावपूर्ण श्रद्धांजली!!!!!

*लोकशाही मूल्यांची जपणूक ही प्रत्येकाची जबाबदारी :प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी*जयवंत प्रतिष्ठान संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा येथे दिनांक 26 नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यशास्त्र विभागामार्फत संविधान दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. मेजर डॉ. अशोक गिरी उपस्थित होते. या निमित्ताने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य मा.मेजर डॉ. अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून लोकशाहीची जोपासना करण्याची आपली किती मोठी जबाबदारी आहे हे सांगितले.आपले संविधान जगातील विचारवंतांच्या साठी एक मोठा दस्तावेज आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि स्वतंत्र लोकशाही भारताचे स्वप्न बघणार्‍या प्रत्येक भारतीयाने ज्या अपेक्षेने संविधान निर्माण करून आपल्याकडे सुपूर्द केले, त्या अपेक्षांची पूर्तता करणे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगून प्रत्येकाने ही लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आणि तिच्या मूल्यांची जपणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. गायत्री जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. सुनील गायकवाड यांनी केले. याप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना संविधानाच्या सरनाम्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.