रहेना रहे हम
लता मंगेशकर (२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) भारतातील एक पार्श्वगायिका गायिका होत्या.[१] त्या सर्वोत्कृष्ट भारतीय गायिकांपैकी एक होत्या, तसेच त्यांना 'भारतीय कोकिळा' (Indian Nightingale) म्हणतात. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.[ संदर्भ हवा ]
भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशी संबंधित निवडक विडीओज, मुलाखत, मराठी गाणी, हिंदी गाणी, इतर माहिती स्त्रोत साठी खालील ब्लॉग पोस्ट ला भेट द्या
https://www.dnyansagar.in/2022/01/Lata-Mangeshkar.html
मंगेशकर ह्या 'भारतरत्न' पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील एम.एस. सुब्बलक्ष्मी (१९९८ मध्ये) नंतर दुसऱ्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला होता.[२]
पुस्तके :
- Reference:
https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B0
No comments:
Post a Comment