जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढ्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर दिनांक 24 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 या कालावधीमध्ये "स्वच्छ भारत, स्वस्थ भारत" या ब्रीदवाक्यासह मौजे वरोशी ता. जावली जिल्हा सातारा येथे संपन्न झाले आज दिनांक 30 मार्च 2022 रोजी या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. तेजसदादा शिंदे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी जयवंत प्रतिष्ठानचे विश्वस्त मा. श्री. दादासाहेब शिंदे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत असताना मा. तेजस दादा शिंदे म्हणाले की विद्यार्थी दशेत होणारे संस्कार आयुष्यभर साथ देतात, प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी ही उद्याचे सुजाण नागरिक आहेत. असे शिबीर युवकांना योग्य दिशा देण्यात मोलाची मदत करतात. या शिबिरामधून शारीरिक श्रमसंस्कारांच्या सोबत जीवनमूल्ये आणि बौद्धिक संस्कार विद्यार्थी सोबत घेऊन निघाले आहेत. समाजाच्या प्रति आपल्या देशाच्या प्रति आपली जबाबदारी अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी पार पाडत आहेत जे स्पृहणीय आहे. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी तसेच विवेकी विचारांच्या जपणूकीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा. दादासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना श्रमसंस्कारांचे महत्त्व समजावून सांगितले. ही संस्कार शिदोरी पाठीशी असेल तर जगातील कुठलीही गोष्ट अवघड नाही असे मत त्यांनी मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. शिबिरात सात दिवसांत नव्याने शिकलेल्या गोष्टी, चांगल्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्या तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तम घडेल असे मत त्यांनी व्यक्त केले. सदर शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, मोफत नेत्र तपासणी, महिला मेळावा, रस्ते दुरुस्ती, गटार स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, पाणपोई स्वच्छता, तसेच विविध विषयांवर प्रबोधनपर कार्यक्रम सात दिवसांच्या कालावधीत उत्तम रित्या पार पडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ संजय भोसले यांनी केलेआभार प्रदर्शन धनश्री देशमुख यांनी मानले तर सूत्रसंचालन गायत्री जाधव यांनी केले समारोप समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ प्रमोद घाटगे, गोरखनाथ नलवडे, विकास अवघडे, सत्यजित चावरे, उपसरपंच संदीप कासुर्डे, वरोशी ग्रामस्थ तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढ्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर दिनांक 24 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 या कालावधीमध्ये "स्वच्छ भारत, स्वस्थ भारत" या ब्रीदवाक्यासह मौजे वरोशी ता. जावली जिल्हा सातारा येथे संपन्न झाले आज दिनांक 30 मार्च 2022 रोजी या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. तेजसदादा शिंदे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी जयवंत प्रतिष्ठानचे विश्वस्त मा. श्री. दादासाहेब शिंदे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत असताना मा. तेजस दादा शिंदे म्हणाले की विद्यार्थी दशेत होणारे संस्कार आयुष्यभर साथ देतात, प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी ही उद्याचे सुजाण नागरिक आहेत. असे शिबीर युवकांना योग्य दिशा देण्यात मोलाची मदत करतात. या शिबिरामधून शारीरिक श्रमसंस्कारांच्या सोबत जीवनमूल्ये आणि बौद्धिक संस्कार विद्यार्थी सोबत घेऊन निघाले आहेत. समाजाच्या प्रति आपल्या देशाच्या प्रति आपली जबाबदारी अशा शिबिराच्या माध्य...