संपादकीय मनोगत आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच सर्व स्नेही यांना मी मुख्य संपादक डॉ. सुधीर नगरकर नमस्कार करतो व सर्वाचे स्वागत करतो. आदरणीय डॉ. नमिता खोत मॅडम दिनांक ३१ मे २०२२ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असताना या प्रसंगी अनेकांच्या मना मध्ये एका चांगल्या ग्रंथाचे प्रकाशन व्हावे अशी भावना आनेक ग्रंथालय प्रोफेशनलस नि मॅडम कडे व्यक्त केली. मॅडम नि त्याच्यावर विचार केल्या नंतर आम्हा सर्वाना हे काम तेवढे सोपे नाही, जेवढे तुम्ही समजता आहात असे सांगितले. या गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश खांडेकर आणि गौरव समितीचे सर्व सदस्य तसेच आज प्रकाशित होणार्या गौरव ग्रंथाचे सर्व संपादक व सहसंपादक मंडळ या सर्वांनी ठरविले की जरी हे अवघड असले तरी अशक्य नाही त्यामुळे गौरव ग्रंथ प्रकाशन करावयाचे ठरले आणि यासाठी विषय ठरविण्यात आला तो म्हणजे “ग्रंथपालनातील सर्वोत्तम नाविन्यपू...