शिवजयंती शिवचरित्रातून काय शिकावे सुरूवात करण्यावर भर द्या, कमतरतेवर लक्ष देऊ नका. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बालशिवबा सोबत फक्त आठ दहा मावळे होते. स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुगल, निजाम, आदिलशहा असे मोठमोठे विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंच. संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वतः नेतृत्व करा. अफजलखानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते. शांत राहून प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने अमंलात आणला होता. माघार घेणे हे सुद्धा काहीवेळा आवश्यक असते. महाराज कित्येक वेळा परिस्थिती पाहून माघार घेत त्यामुळे होणारे नुकसान टळत असे आणि नव्याने तयारी करण्याची संधीही मिळत असे. सहकारी चांगले निवडा. महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची खरी ताकद होती. जय भवानी !जय शिवाजी !! शिवराय मनामनात!! शिवजयंती घराघरात!! From Dr. Sudhir Nagarkar
*तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेत पुरुष व महिला गटात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय अव्वल स्थानावर* सातारा जिल्हा क्रीडा विभागामार्फत दि .३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत आमदार शशिकांत शिंदे ज्युनियर कॉलेजचे १९ वर्षाखालील गटात खो - खो स्पर्धेत मुली व मुले यांनी प्रथम क्रमांक मिळविला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली . मामुर्डी ता.जावली या ठिकाणी सदर स्पर्धा पार पडल्या असून स्पर्धेसाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. तेजेस जाधव व शारीरिक शिक्षण संचालक प्रा.प्रमोद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले . महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी तसेच उपप्राचार्य डॉ.प्रमोद घाटगे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना जिल्हास्तरीय होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment