आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रान भाज्या रेसिपीज चे प्रदर्शन संपन्न-

आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयात रान भाज्या रेसिपीज चे प्रदर्शन संपन्न- आजकालच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये माणसाकडे आरोग्य व समतोल आहार घेण्यासाठी अजिबात वेळ नाही. याचाच परिणाम म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या बाबतीत समस्या वाढत आहेत. याचा फायदा घेऊन विदेशी कंपन्या आपली निरनिराळी उत्पादने बाजारात विकत आहेत आणि युवा पिढी याचा अंधाधुंदपणे वापर करत आहेत. वेगवेगळ्या आकर्षक जंक आणि फास्ट-फूड मुळे भविष्यात आरोग्याच्या बाबतीत उद्भवणाऱ्या नव्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता निसर्गाशी नाते जोडून जंक फूड ला बगल देऊन आपला परंपरागत वारसा जपण्याचा प्रयत्न आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालया मधील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे रेसिपीज चे प्रदर्शन आयोजित करून केला. मेढा हा भाग डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेला व निसर्गाशी नाळ जोडलेला असल्याने तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा डोंगराळ भागातील असल्याने या उपक्रमासाठी जवळपास १२ प्रकारच्या रान भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांची रेलचेल येथे दिसून आली. यात शेवगा, कु...