*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना ( ISO) चे 9001-2015 जागतीक मानांकन प्राप्त*=

*आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना ( ISO) चे 9001-2015 जागतीक मानांकन प्राप्त* ================ दिनांक 26 जानेवारी : जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित,आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन तथा आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना,या संस्थेकडून आय.एस.ओ.9001-2015 जागतीक मानांकन आज प्राप्त झाले आहे.त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा,हे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने प्रमाणित केलेले पहिले महाविद्यालय ठरले आहे. आज दिनांक 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मंगल प्रसंगी या महाविद्यालयास "आय. एस.ओ.9001-2015" प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला.यावेळी पुणे येथील आय एस.ओ .संस्थेचे सल्लागार श्री. अनिल येवले यांच्या हस्ते महाविद्यालयाला आय.एस.ओ.नामांकन प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही.गिरी होते.तर विचारपीठावर उपप्रचार्य डॉ. प्रमोद घाटगे, आय.एस.ओ चे लेखाधिकारी माननीय संदिप कोठ...